स्पूटनिक लसीला केंद्राची मान्यता ?

आणखी चार लसी येणार

0

- Advertisement -

नवी दिल्ली: कोव्हीड-19 या विषाणूच्या विरूद्ध लढण्यासाठी उपलब्ध असलेल्या लसींचे डोस कमी पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने, रशियाने विकसित केलेल्या ‘स्पुटनिक 5’ या लसीला मान्यता देण्याचे जवळपास निश्चित केले आहे. सिरम इन्स्टीट्य़ुटच्या ‘कोव्हीडशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ नंतर ही तिसरी लस  मान्यता मिळाली तर उपलब्ध होणार आहे.

भारतात डॅा. रेड्डीज् लॅबोरोटरी त्याची निर्मिती करीत असून त्या लसीचे तिस-या टप्प्यातील प्रयोग सुरु असून त्या लशीची परीणामकारकता 91.6 टक्के असल्याचे सांगण्यात येते आहे.

गेल्या 1 एप्रिल रोजी भारताच्या लस विषेश तज्ञ समितीकडून या लसीबद्दलच्या डाटाची मागणी करण्यात आली होती तसेच रशियातील तिस-या टप्प्यातील चाचण्यांचा डाटाही समितीने मागविला आहे. येत्या काही दिवसांत समिती ह्या लसीची शिफारस करण्याची शक्यता असून त्यानंतर केंद्रीय औषध मानांकन व नियंत्रण संस्थेतर्फे लसीच्या वापराची मान्यता मिळेल.

- Advertisement -

रशियच्या डारेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि भारतातील डॅा. रेड्डीज् लॅब यांच्यात गेल्या सप्टेंबर महीन्यात भागीदारी झाली असून स्पुटनिक 5 या लसीचे 18 ते 99 वयोगटातील सुमारे 1600 लोकांवर चाचण्या झाल्या असल्याची माहीती आहे.

स्पुटनिक 5 या लसीचा वापर रशिया व्यतिरिक्त संयुक्त अरब अमिराती, व्हेनेझुएला आणि बेलारूस या देशांनी सुरु केला आहे. .या व्यतिरिक्त भारतात जान्सन आणि जान्सन, झायडस कॅडिला, सिरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेक या औषध निर्मिती कंपन्यांच्या लसीसुद्धा लवकरच वापरात येणार आहेत.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.