प्रत्येक 10 पैकी 1 कोरोना रूग्णाला रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये बनलेली ऑक्सिजन मोफत मिळाली – नीता अंबानी

0

- Advertisement -

मुंबई: रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 44 व्या वार्षिक सभेला संबोधित केले. कोरोना काळात रिलायन्स फाउंडेशनने केलेल्या कामांचा उल्लेख नीता अंबानी यांनी केला. रिलायन्स फाऊंडेशनने कोरोनाशी लढण्यासाठी 5 मोहिमा सुरू केल्या असल्याचे निता अंबानी यांनी सांगितले. त्याअंतर्गत मिशन ऑक्सिजन, मिशन कोविड इन्फ्रा, मिशन अन्नसेवा, मिशन एम्प्लाय केअर आणि मिशन लस सुरक्षा यांचा समावेश आहे. यावर्षी नवी मुंबईत जिओ इन्स्टिट्यूट सुरू होणार असल्याचेही नीता अंबानी AGM मध्ये भागधारकांना संबोधित करताना म्हणाल्या.

रिलायन्स देशातील एकूण वैद्यकीय ग्रेड द्रव ऑक्सिजनपैकी 11% उत्पादन करीत आहे.

भागधारकांना संबोधित करताना नीता अंबानी म्हणाल्या की, आज देशातील एकूण वैद्यकीय ग्रेड द्रव ऑक्सिजनपैकी 11% उत्पादन रिलायन्स करीत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने (RIL) अवघ्या 2 आठवड्यांत दररोज 1100 मेट्रिक टन ऑक्सिजन तयार करण्याचा विक्रम केला आहे. सध्या रिलायन्स एकाच ठिकाणी ऑक्सिजन उत्पादन करणारी देशातील  सर्वात मोठी कंपनी आहे. देशातील प्रत्येक 10 कोरोना रुग्णांपैकी 1 रूग्णाला रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये बनत असलेले ऑक्सिजन विनाशुल्क दिली जात आहे.

मुंबईत कोरोनासाठी 250 बेडचे रुग्णालय उभारले

- Advertisement -

नीता अंबानी यांनी म्हटले की, कोविड विरोधात लढण्यासाठी देशात मजबूत इनफ्रास्ट्रक्चर असणे गरजेचे आहे. आम्ही आमच्या मिशन कोव्हीड इन्फ्राद्वारे हे मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना उद्रेकानंतर काही दिवसातच आम्ही मुंबईत 250 बेडचे कोविड समर्पित रुग्णालय स्थापन केले. कोविडची दुसरी लाट आली तेव्हा आम्ही अतिरिक्त 875 बेड स्थापित केले. आम्ही कोविड केअरसाठी देशभरात ऑक्सिजन युक्त 2000 खाटांची व्यवस्था केली.

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.