ताब्यात घेतलेल्या 150 भारतीयांची तालिबानकडून सुटका: पुन्हा काबूल विमानतळावर सोडले

0

- Advertisement -

काबूल : अफगाणिस्तान मधल्या काबूल विमानतळावरून शनिवारी पहाटे 150 भारतीय नागरिकांना तालिबानच्या एका गटाने ताब्यात घेतले असल्याची बातमी आली होती. या सर्व भारतीयांना विमानतळापासून काही अंतरावर असलेल्या आलो-कोझई या कंपनीत सुरु केले गेलेल्या एका तात्पुरत्या तालिबानी पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते, त्यांचे पासपोर्टही जप्त करण्यात आले होते. तालिबानच्या प्रवक्त्याने या बातमीचे खंडनही केले होते.

परंतु अफगाणिस्तानातील स्थानिक वर्तमानपत्र Etilaatroz ने दिलेल्या वृत्तानुसार आता या सर्व 150 भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांचे पासपोर्ट तपासण्याचे काम तालिबानच्या गटाकडून केले जात होते आणि आता त्या सर्व भारतीय नागरिकांना काबूलच्या हामिद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेण्यात येत आहे.

या आधी वृत्तसंस्था एएऩआयने अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी विमानतळावर वाट पहात असलेल्या 150 भारतीय नागरिकांचे तालिबानने अपहरण केले असे वृत्त दिले होते. परंतु त्यावृत्तास अधिकृत दुजोरा देण्यात आला नव्हता.
तसेच एका प्रत्यक्षदर्शीच्या आधारे काबूल नाऊ या वृत्तसंस्थेनेही तालिबानचा एक गट 8 मिनी व्हॅन मधून आला आणि त्यांनी विमानतळावर प्रतिक्षा करीत असलेल्या काही भारतीय, अफगाण शीख आणि अफगाणी नागरिकांना आपल्या बरोबर नेले अशा प्रकारचे वृत्त दिले होते,

- Advertisement -

परंतु आता हे नागरिक सुरक्षित असून त्या सर्वांना विमानतळावर नेण्यात येत असल्याचे कळते.

 ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा, किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.