इंजिनिअरिंगचा अभ्यास करा आता मराठीमध्ये !

0

- Advertisement -

नवी दिल्ली : इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम आता मराठीमध्ये उपलब्ध होणार आहे. ‘स्वयम्’ ने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरची मदत सुरवातीला या अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणार असल्याची माहीती एआयसीटी अर्थात अखिल भारतीय तंत्र शिक्षण मंडळाने दिली आहे.

मराठीसह हिंदी, बंगाली, तेलगू, तामिळ, गुजराथी, कन्नड आणि मल्याळम् याइतर प्रादेशिक भाषांमध्ये इंजिनिअरींग अभ्यासक्रमाचे भाषांतर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षीपासून हा उपक्रम सुरु होणार आहे.  अभ्यासक्रमात भाषांतराचा अति हट्ट नसेल. वैज्ञानिक संकल्पना इंग्रजीत समजून घ्यायला सोपे असल्याने त्या तशाच राहतील फक्त संकल्पना समजून देण्यासाठी प्रादेशिक भाषा वापरली जाणार आहे.

- Advertisement -

देशातील अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान हे मातृभाषेतून उपलब्ध करून दिल्यास त्यांना संकल्पना सजावून घेणे सोपे जाईल असे अखिल भारतीय तंत्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी म्हटले आहे.

जगातल्या इतर अनेक देशांमध्ये त्या त्या भाषांमध्येच इंजीनियरिंग उपलब्ध आहे. चीन, जपान, जर्मनी तसे फ्रान्समध्ये अशाच पद्धतीने इंजिनियरिंग शिकवली जाते. नव्या शैक्षणिक धोरणांमध्ये प्रादेशिक भाषात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे, त्यानुसार एआयसीटीई अर्थात ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने हे पाऊल उचलले आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.