महीना अखेरीस आणखी एक लस होणार उपलब्ध; भारतातच होतेय उत्पादन वाचा कोणती आहे लस

0

- Advertisement -

भारतात लसींच्या अपु-या पुरवठ्यांमुळे सुरु असलेली लसीकरण मोहीम खुप रखडत आहे. देशात सध्या कोव्हिडशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींनाच मान्यता असून त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरु आहे. रशियाची स्फुटनिक व्ही या लसीला ही मान्यता असली तरी त्या लसीची आयात कमी असून त्याचे उत्पादन अजून मोठ्या प्रमाणावर सुरु नाही. मात्र आता या महीना अखेरीपर्यंत आणखी एक लस भारतात आपात्कालीन वापरास उपलब्ध होऊ शकते अशी माहीती समोर येते आहे.

झायडस कॅडिला ही औषधनिर्माण कंपनी या महिन्यात आपल्या ZyCoV-D या कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या  आपत्कालीन वापराच्या अधिकृततेसाठी अर्ज केंद्र सरकारच्या औषध नियंत्रण संस्थेकडे सादर करणार असल्याची माहीती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शर्विल पटेल यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.

औषध नियंत्रक संस्थेकडून ZyCoV-D ह्या लसीला परवानगी मिळाल्यास भारतात लसीकरण मोहीमेसाठी वापरली जाणारी ती चौथी लस असेल. आणीबाणीच्या वापरासाठी मंजूर झाल्यास ZyCoV-D देशात लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने लस डोसचा तुटवडा भरून काढण्यास मदत करू शकते.

ही लस मेड इन इंडीया असून पुर्णपणे वेदना विरहीत आहे. ह्या लसीसाठीची मान्याता मे महिन्यातच मिळेल असा कंपनीला विश्वास आहे.  सध्या दरमहा एक कोटी डोस तयार करण्यात येत असून ते उत्पादन दरमहा 3 ते 4 कोटी डोसपर्यंत वाढविण्यासाठी इतर दोन उत्पादन कंपन्यांशी या आधीच चर्चा सुरु असल्याचे पटेल यांनी सांगितले आहे.

ही लस 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानात सर्वसाधरणपणे ठेवली पाहिजे, परंतु ती 25 डिग्री सेल्सिअस तापमानात देखील स्थिर राहते असा दावा पटेल यांनी केला आहे.

- Advertisement -

“क्लिनिकल चाचण्यांसाठी एकूण 28 हजार स्वयंसेवकांची निवड केली होती, जी इतर कोणत्याही कंपनीच्या चाचणयांपेक्षा जास्त आहे.” असे पटेल म्हणाले.

तसेच त्यांच्या कंपनीने लसीच्या चाचण्यांसाठी 12-17 वयोगटातील मुलांनाही समाविष्ट केले असल्याची माहीती त्यांनी दिली आहे.

दरम्यान एप्रिलच्या सुरुवातीस  झायडस कॅडिला या कंपनीच्या कोविड 19 च्या उपचारांसाठी व्हिराफिन हे औषध आपात्कालीन वापरासाठी औषध नियंत्रक संस्थेकडून मंजूर करण्यात आले होते. नुकतेच कंपनीने ह्या औषधाची किंमत जाहीर केली आहे.

व्हिराफीनच्या एका डोसची किंमत सुमारे 11 हजार 900 रुपये एवढी आहे. उपचारांदरम्यान ह्या औषधाची एकच डोस पुरेसा असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.