ग्राहकांसाठी RBI ची खुशखबर, ATM मध्य़े कॅश नसेल तर बॅंकाना ‘या’ तारखेपासून होईल दंड

0

- Advertisement -

मुंबई: ATM मशिनमध्ये पैसे नसतील तर बॅंक ग्राहकांना मोठा मनस्तापाला सामोरे जावे लागते. त्यामुळे ग्राहाकांना होणा-या या मनस्तापावर आता RBI ने आता कडक धोरण अवलंबिले आहे. देशातील सर्व बॅंकांना RBI ने एक नोटीस जारी केली असून ATM मध्ये जर पैसे नसतील तर संबंधित बँकेला दहा हजार रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे. RBI ने काल (10 ऑगस्ट) ही घोषणा केली असून हा नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

“अनेक एटीएममध्ये कॅशची कमी असल्याने मोठ्या कालावधीसाठी एटीएम मशिन बंद असतात. त्यामुळे ग्राहकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. यावर असेही लक्षात आले आहे की एटीएममधील रोख संपल्यावरही काही बँका त्यामध्ये पुन्हा रोख भरणा नाहीत, त्याला विलंब करतात. त्यामुळे आरबीआय आता नवीन नियम लागू करत असून त्यामुळे एटीएममध्ये पैसे नसल्यास बँकेला दहा हजार रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे.” असे RBI ने जारी निवेदनात म्हटले आहे.

आरबीआयने यासाठी ‘Scheme of Penalty for non-replenishment of ATMs’ या नियमाची घोषणा केली आहे. यानुसार एटीएममध्ये दहा तासाहून अधिक काळासाठी कॅश नसेल तर हा नियम लागू करण्यात येणार आहे.

- Advertisement -

सर्व बँकांनी आपल्या एटीएम सर्व्हिसला  चांगल्या प्रकारे सुरु करावे. आपल्या एटीएममध्ये किती कॅश आहे याचे योग्य पद्धतीने नियोजन करावे आणि वेळ मिळताच पुन्हा या एटीएममध्ये पैसे टाकावेत असे RBI ने स्पष्ट केले आहे.

सविस्तर नोटिस वाचा – RBI Notice to Banks ragarding atms

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.