‘या’ घटनेला बाबा रामदेव यांनी संबोधले ‘मेडिकल दहशतवाद’, जाणून घ्या सविस्तर माहिती

0

- Advertisement -

नवी दिल्ली: बाबा रामदेव या न त्या कारणाने नेहमी चर्चेत असतात. अलीकडेच, उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये आयोजित कुंभमेळ्याच्या वेळी झालेल्या कथित कोरोना चाचणी घोटाळ्यावर योगगुरू रामदेव यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

रामदेव यांनी या संपूर्ण फसवणूकीला वैद्यकीय दहशतवाद असे म्हटले आहे. हरिद्वार कुंभ मेळा येथे कोरोना टेस्टिंगमध्ये फसवणूक करणार्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी रामदेव यांनी केली आहे. यावेळचा कुंभमेळा हरिद्वार, उत्तराखंडमध्ये आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये कोरोनाचा नकारात्मक अहवाल सोबत असणे अनिवार्य होते. मात्र, नंतर एक लाख कोरोना चाचण्या बनावट असल्याचे उघड झाले. त्यामुळे कोरोंनाचा संसर्ग वाढल्याचे तज्ञांचे मत आहे.

इंडिया टुडेशी बोलताना रामदेव यांनी कथित कोविड घोटाळ्यावर म्हटले आहे की, “ज्याने अशी चूक केली असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे, तसेच चुका पुन्हा होणार नाहीत याची जबाबदारी घ्यावी. ते पुढे म्हणाले की अशा लोकांवर फौजदारी खटला चालविला पाहिजे.”

- Advertisement -

रामदेव पुढे म्हणाले, “जेव्हा मी प्रथम वैद्यकीय दहशतवाद, वैद्यकीय अराजक असे शब्द वापरले तेव्हा लोक मलाच नवे ठेवत होती. जे पण व्यक्ति या कोविड चाचणी घोटाळ्यात सामील आहेत त्यांना कठोर शिक्षा मिळावी.”

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.