येत्या दोन आठवड्यात बॅंकाना आहेत सुट्ट्या, वाचा कोणत्या नेमक्या कोणत्या तारखेला

0

- Advertisement -

जर तुमची बँकेत काही महत्वाची कामे असतील आणि ती कामे नंतर करता येतील अशा विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. एखाद्या दिवशी तुम्ही बँकेमध्ये कामासाठी जाल आणि बँकेला टाळे असलेले तुम्हाला दिसू शकत. त्यामुळे तुम्हाला अगोदरच काही गोष्टी समजायला हव्या. ऑगस्ट महिन्यात बँकांना शनिवार, रविवार सह १५ सुट्या आहेत.

RBI च्या माहिती नुसार बँकांना ८ दिवस सुट्टी असणार आहेत. तसेच याव्यतिरिक्त शनिवार आणि रविवार साप्ताहिक सुट्टी देखील असेल. त्यामुळे जर तुम्हाला खर्चासाठी, गाडीचा हफ्ता, विमा, मुलांची शाळेची फी, यासारखी महत्वाची कामे करायची असतील तर तुम्हाला ही कामे लवकर करून घेतली पाहिजे. नाहीतर तुम्हाला नंतर मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

ऑगस्ट महिन्यातील राहिलेल्या दोन आठवड्यात बँकांच्या सुट्या खालीलप्रमाणे:-

- Advertisement -

16 ऑगस्ट, 2021 – पारसी नववर्ष असल्यामुळे महाराष्ट्रातील बेलापुर, मुंबई आणि नागपुर झोन मध्ये बँकांना सुट्टी
19 ऑगस्ट, 2021 – मोहरम असल्यामुळे अगरतला, अहमदाबाद, बेलापुर, भोपाळ, हैदराबाद, जयपुर, जम्मू, कानपुर, कोलकता, लखनऊ, मुंबई, नागपुर, नवी दिल्ली, पटना, रायपुर, रांची आणि श्रीनगर या झोन मध्ये सुट्टी
20 ऑगस्ट, 2021 – मोहरम आणि पहिला ओणम मुळे बेंगलुरु, चेन्नई, कोच्ची आणि केरळ या ठिकाणी सुट्टी
21 ऑगस्ट, 2021 – थिरुवोणम मुळे कोच्ची आणि केरळ येथे सुट्टी
22 ऑगस्ट, 2021 – रक्षाबंधन आणि साप्ताहिक सुट्टी
23 ऑगस्ट, 2021 – या दिवशी श्री नारायण गुरु जयंती मुळे कोच्ची आणि केरळ झोन मध्ये बँकांना सुट्टी
28 ऑगस्ट, 2021 – चौथा शनिवार असल्यामुळे सुट्टी
29 ऑगस्ट, 2021 – रविवार असल्यामुळे साप्ताहिक सुट्टी
30 ऑगस्ट, 2021 – जन्माष्टमी असल्यामुळे सुट्टी
31 ऑगस्ट, 2021 – श्री कृष्ण अष्टमी असल्याने हैदराबाद मध्ये बँक बंद असतील

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा. किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.