कोरोनावर इलाजासाठी गोमुत्र प्या; भाजप आमदाराचा अजब सल्ला

0

- Advertisement -

आपल्या बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्याच्या बैरिया विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी गोमूत्र, हळद आणि तुपाच्या मिश्रण पिण्याचा सल्ला दिला आहे. एवढ्यावर न थांबता एक व्हिडिओदेखील व्हायरल केला आहे त्यात ते स्वत: गोमूत्र पित असून दररोज गोमूत्रं प्यायल्याने कोरोना होत नाही असे अजब विधान केले आहे.

सकाळी दात घासण्याआधी रिकामी पोटी थंड पाण्यात ५ झाकण गोमूत्र मिसळून प्यावे आणि अर्धा तास काहीच खाऊ नये. असं केल्यास कोरोनाच नाही तर कोणताच आजार तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही, असा अजब सल्ला आमदार सुरेंद्र सिंह यांनी व्हिडीओद्वारे दिला आहे.

वैज्ञानिक उपायांपेक्षा हा उत्तम उपाय असून मी रोज गोमूत्र पित असल्याने अजूनही ठणठणीत आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

इतकंच नाही तर कोरोनात अनेकजणांचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू होत आहे. गोमूत्राचं सेवन करुन यातून बचाव करता येऊ शकतो.

खोकला, ताप यांसारख्या आजारांपासून वाचण्यासाठी गायीच्या तुपात हळद पावडर मिसळून ठेवतो व जेव्हा बाहेर दौऱ्यावर जातो कुठेही पाणी पिल्यानंतर हे मिश्रण पितो. यामुळे कोरोनापासून स्वत:चे संरक्षण करता येते असेही सुरेंद्र सिंह यांनी म्हटले आगहे.

- Advertisement -

गेल्या वर्षी त्यांच्या मतदार संघात गोळीबार करून एकाचा खुन केल्या प्रकरणी ते चर्चेत आले होते.

अनेक लोकांनी त्यांचा हा व्हिडीओ सामाजिक माध्यमांत शेअर केला आहे.

 

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.