अजब: भाजप आमदाराने केला कोविड सेंटर मध्येच वाढदिवस साजरा

0

- Advertisement -

देशात कोरोनाचे थैमान घालणे सुरू असतानाच अनेक नेते कोविडचे नियम तोडताना दिसत असतात. हे नियम काय फक्त सामान्य लोकांसाठीच आहेत का? असे वाटू लागले आहे.

मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. यासाठी त्यांना नंतर माफीही मागावी लागली. याचे कारण म्हणजे त्यांनी आपला वाढदिवस इतरत्र कुठेही न करता कोविड लसीकरण केंद्रात साजरा केला विशेष महांजे तिथे कोविड केअर सेंटरही आहे. घटनेचा विडियो वायरल झाल्यावर  त्यांच्यावर चौफेर टीका झाली.

न्यूज एजन्सि एएनआयने याबाबत फोटो शेयर करत माहिती दिली आहे. महिला आमदारांचे नाव माधुरी जयस्वाल आहे. एका फोटो मध्ये त्या केक कापताना दिसत आहेत. विशेषतः त्यांनी केक कापताना गर्दी जमवली होती आणि मास्क पण घातला नव्हता. घटनेने जोर पकडल्यावर याबद्दल माफी मागत त्यांनी म्हटले की, “पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खुशीत वाढदिवस साजरा केला असून, या घटनेबद्दल मी वार्डातिल सर्व सदस्यांची माफी मागते.”

- Advertisement -

त्याच वेळी जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ प्रवीण जाडिया म्हणाले की, ही बाब जिल्हा अधिकार्‍यांच्या  निदर्शनास आणून देण्यात आली आहे. लसीकरण केंद्रात असे काही घडले असेल तर आरोग्य विभाग त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.