डॉक्टरांवर होणार्‍या हल्ल्यांबाबत केंद्राची कडक भूमिका, राज्यांना FIR नोंदवण्याचे दिले आदेश

0

- Advertisement -

नवी दिल्ली: कोरोना काळात डॉक्टर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी दिवसरात्र आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. कित्येक जन नेक महिन्यांपासून आपल्या घरी सुद्धा गेले नाहीत. मात्र, बर्‍याच वेळा एखाद्या रुग्णाचे नातेवाईक डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ले करतात.

देशभरातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांच्यावरील होणार्‍या हल्ल्यांवर केंद्र सरकारने लक्ष दिले आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भाल्ला यांनी आरोग्य कर्मचार्‍यांवर होणार्‍या हल्ल्याच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजनांच्या अंमलबजावणीकरिता सर्व राजी आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आणि प्रशासकांना पत्र लिहिले आहे. यात केंद्रसरकार कडून राज्यांना डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ला करणार्‍यावर FIR नोंदवण्याचे आदेश मिळाले आहेत.

डॉक्टर, आरोग्यसेवा कर्मचारी यांच्यावरील कोणत्याही हल्ल्यामुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. अलीकडेच बिहार आणि मध्य केरळमधील डॉक्टरांनी डॉक्टरांवरील हिंसाचाराविरोधात केंद्रीय काडा बनवण्याच्या मागणीसाठी आपली दवाखाने बंद ठेवली होती. अशा प्रकारचा हिंसाचार रोखण्यासाठी आयएमएच्या (Indian Medical Asscociation) प्रत्येक शाखेत समन्वय टीम तयार करण्यासाठी जनसंवाद साधण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

आयएमएने (IMA) कायदा बनवण्याची केली मागणी

आयएमएने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘डॉक्टर आणि आरोग्य व्यावसायिकांवरील वाढती हिंसा पाहून आम्हाला खूप वाईट वाटत असून, दिवसेंदिवस असेच होत आहे. आयएमए हिंसाविरोधात कायदा बनवण्यासाठी केंद्रावर दबाव आणत आहे.’

या अहवालांवर आता आरोग्य मंत्रालयाने कठोर भूमिका घेतली आहे. आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, डॉक्टरांवर कोणत्याही प्रकारचा हिंसाचार अजामीनपात्र गुन्हा प्रकारात येतो. मंत्रालयाने राज्यांना दिलेल्या पत्रात डॉक्टरांच्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी असे निर्देश दिले आहेत.

या पत्रात असे म्हटले आहे की केंद्र सरकारने एक अध्यादेश आणला होता, जो आता एक कायदा बनला आहे, त्यानुसार डॉक्टरांविरूद्धचा हिंसा हा अजामीनपात्र गुन्हा आहे. सर्व राज्यांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की डॉक्टर भीतीमुक्त वातावरणात लोकांवर उपचार करू शकतील, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.