गेल्या 70 वर्षातलचं होतं की मग हे, आता का विकताय – राहूल गांधी

0

- Advertisement -

नवी दिल्ली: नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार हे भारतात गेल्या 70 वर्षात देशात विविध क्षेत्रातील उभी करण्यात आलेली संपत्ती विकण्याचे काम सुरु केले असल्याची टिका कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी काल नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईनचा शुभारंभ केला त्या पार्श्वभूमीवर त्यांना आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतील तेव्हा ते बोलत होते.

गेल्या 70 वर्षातील कॉंग्रेस सरकारांच्या काळात उभ्या केलेल्या सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना आपल्या दोन, तीन उद्योगपतींना विक्री करण्याचा चंग केंद्र सरकारने बांधला आहे, त्यासाठी केंद्र सरकार निमित्त पुढेत करत आहेत की, आम्ही हे सर्व भाडेतत्वावर देत आहोत..परंतु सरकार स्पष्टपणे हा अर्थव्यवस्थेचा गैरवापर असून गेल्या 70 वर्षात काही नव्हंत तर मग विकायला का काढलं असा सवाल राहूल गांधी यांनी केला आहे.

तसेच आमचा खासगीकरणाला विरोध नाही, परंतु हे जे खासगीकरण केंद्रातील सरकारने सुरु केले आहे ते एकाधिकारशाही निर्माण करण्यासाठी केले जात आहे. उर्जा, टेलिकॉम, राष्ट्रीय गोदामं, महत्वाच्या खाणी, विमानतळं, बंदरं, रेल्वे आणि रस्ते महामार्ग या सगळ्यांचे खासगीकरण हे काही काही ठराविक उद्योगपतींच्या हातात जाणार असून त्यातून औद्योगिक एकाधिकारशाहीलाच उत्तेजन मिळणार असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

देशातील य़ुवकांना आवाहन करीत त्यांनी असे म्हटले आहे की, औद्योगिक क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण झाली तर त्याच गतीने तुम्हाल रोजगार मिळणंही बंद होईल, जे सार्वजनिक आहे ते खासगी पण एकाच व्यक्ति वा कार्पोरेटच्या हातात गेले तर ते तुमच्या भविष्यावर केलेले आक्रमण असेल.

तसेच सध्या देशातील विमानतळं आणि बंदंर कोणत्या उद्योगपतींना मिळताहेत हे भारतातील सर्व नागरिकांना निश्चितच माहिती आहे असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा, किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.