केजरीवाल सरकारच्या ‘घर घर राशन’ योजनेला केंद्राचा ‘ब्रेक’

0

- Advertisement -

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील केजरीवाल सरकारने सुरु केलेली महत्वाकांशी अशा ‘घर घऱ राशन’ (Ghar Ghar Ration Scheme) योजनेला केंद्र सरकारने ब्रेक लावला आहे. दिल्लीतील जवळपास 72 लाख लोकांना थेट घराच्या दारात अन्नधान्य पुरविण्याची योजना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपुर्वी घोषित केली होती. येत्या आठवड्यात ती सुरु करण्यात येणार होती.

परंतु या योजनेला केंद्र सरकारकडून आवश्यक परवानगी घेतली नसल्याचे कारण देत आता केंद्र सरकारने त्यावर बंदी घातली आहे. वास्तविक पाहता या योजनेत्या नावावरून दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात संघर्ष सुरु आहे.

याच नावाने राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा कायद्यांतर्गत एक योजना केंद्र सरकारने चालविली आहे. त्या योजनेच्या नावात फक्त संसदच बदल करू शकते. नाव बदलण्याचा राज्यांना अधिकार नाही. त्यामुळे दिल्ली सरकार ने या योजनेचे नाव बदलावे तसेच या योजनेशी  कोणाही व्यक्तिला जोडण्यात येऊ नये असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे.

- Advertisement -

गेल्या मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने हरियाना, उत्तर प्रदेश तसेच दिल्लीत अडकलेल्या मजदुरांसाठी काय उपाययोजना केल्या आहेत असा प्रश्न दिल्ली सरकारला विचारला होता. तसेच आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत अशा अडकलेल्या मजदूर वा प्रवासी असतील तर त्यांना अन्नधान्य पुरविण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यांच्याकडे ओळखपत्रे नसतील तरीही अन्नधान्य त्यांना देण्यात यावे असे आदेश न्यायालयाने दिले होते.

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.