‘या’ राज्यातील गावांत होतेय शेणापासून होतेय वीजनिर्मिती

0

- Advertisement -

रायपूर: छत्तीसगडमधील बेमतारा या जिल्ह्यात वीजनिर्मितीसाठी इंधन म्हणून शेणाचा वापर सुरु करण्यात आला आहे. अशा वीजनिर्मिती युनिटचे उद्घाटन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या हस्ते गांधी जयंतीनिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात करण्यात आले.

राज्यातील दुर्गाजिल्ह्यातील सिकोळा, रायपूरमधील बंचारोडा आणि बेमेतारा येथील राखी या गावांतून शेणाद्वारे वीजनिर्मिती प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे ही गावे शेणाने उत्पादित वीजेने प्रकाशमान होतील, असे राज्याच्या जनसंपर्क विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

छत्तीसगड सरकारच्या सुराजी गाव योजनेअंतर्गत राज्यातील गावांमध्ये पशुधन संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या हेतूने 10 हजार 112 गोठे बांधण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी 6 हजार 112 गोठे बांधले गेले असून त्यांचे काम सुरु झाले आहे. आतापर्यंत या गौठ्यांमधून 51 लाख क्विंटलहून अधिक शेण खरेदी करण्यात आले आहे. त्या बदल्यात गावकऱ्यांना आणि पशुपालकांना 102 कोटी रुपये दिले गेले आहेत. आतापर्यंत 12 लाख क्विंटलहून अधिक गांडूळखत, सुपर कंपोस्ट खत तयार झाले आहे आणि शेणखत विकले गेले आहे.

- Advertisement -

अशा विकसित केलेल्या गौठ्यांमधून तयार झालेली वीज ग्रामीण औद्योगिक उद्यानांमध्ये बसविलेल्या यंत्र सामुग्री चालविण्यासाठीही वापरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

“एका युनिटद्वारे शेणाने 85 क्यूबिक मीटर गॅस तयार होईल. एक क्यूबिक मीटर गोबर गॅस प्रति तास 1.8 किलोवॅट वीज निर्माण करत असल्याने, एका युनिटमध्ये 153 किलोवॅट वीज प्रति तास तयार केली जाईल. अशा प्रकारे, सुमारे 460 किलोवॅट वीज असेल सुरु करण्यात आलेल्या तीन गावातील गौठ्यांमध्ये बसवलेल्या बायो गॅस जेनसेट युनिटमधून प्रति तास निर्माण होते,” असेही ते म्हणाले.

तुम्ही आम्हाला Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188) वरही फॅालो करु शकता.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.