Corona News Update: देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत 10 हजाराने वाढ, गेल्या 24 तासांत 440 मृत्यु

0

- Advertisement -

नवी दिल्ली: देशातील अनेक राज्ये कोरोनाच्या निर्बंधात शिथिलता देत असल्याचे दिसत असतानाच कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून यायला लागली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने आज (बुधवारी) जाहीर केलेल्या आकडेवारीत गेल्या चोविस तासांत देशांत 35 हजार 178 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या मंगळवारी संपलेल्या 24 तासांत नव्याने सापडलेल्या रुग्णांपेक्षा 10 हजारहून अधिक आहे.

मंगळवारी देशातील रुग्णसंख्या ही 25 हजार 166 एवढी होती. ती गेल्या 156 दिवसांतील निच्चांकी रुग्णसंख्या होती परंतु आज बुधवारी मात्र कोरोनाच्या रुग्ण संख्येत 10 हजाराहून अधिक रुग्णांची भर पडली आहे.

कोरोना विरोधात सुरु असलेल्या लढाईत सार्वजनिक निर्बंध जरी शिथिल होत असले तरी नागरिकांनी सार्वजनिक व्यवहारात कोरोनासाठी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचना पाळल्या नाहीत तर येत्या काही काळात यात वाढ होण्याची शक्यता अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्थेतील तज्ञांनी वर्तविली आहे.

गेल्या 24 तासात 37,169 रुग्ण कोविडमुक्त झाले असून लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत  देशभरात लसीच्या 56.06 कोटी मात्रा देण्यात आल्या असल्यायाची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

देशातील रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97.52% एवढा असून मार्च 2020 पासूनचा हा सर्वात अधिक दर आहे, देशात आतापर्यंत एकूण 3,14,85,923 कोरोनामुक्त झाले आहेत.

कालच्या 24 तासांत देशभरात 440 लोकांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर वाचा.. https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1746854

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.