कोरोनाचा आलेख उतरतोय, मात्र ‘या’ राज्यांत अजूनही आहेत एक लाखांपेक्षा जास्त अॅक्टिव रुग्ण

0

- Advertisement -

नवी दिल्ली: देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही कोविड-19 चे संकट अजूनही कमी झाले नाही. देशातील सक्रिय कोरोना रुग्ण याचे कारण आहे. काल बुधवारी (16 जून) देशात 67,208 नवीन रुग्ण आढळले असून 2330 रुग्णांनी त्यांचा जीव गमावला आहे.  देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 8,26,740 आहे.

दरम्यान देशभरात कोरोनाची नवीन रुग्ण संख्या झपाट्याने कमी होताना दिसत असली तरीही देशातील 4 राज्यांत अजूनही उपचाराधीन रुग्णसंख्या प्रत्येकी 1 लाखांपेक्षा जास्त आहे. देशातील एकूण सक्रिय रुग्णसंख्येत या 4 राज्यांतील प्रकरणे अर्ध्यापेक्षा जास्त आहेत.

या चार राज्यांत आहेत 1 लाखांपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार कर्नाटकात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या 1,51,566 आहे. महाराष्ट्रात कोरोनाची 1,36,661 सक्रिय रुग्ण आहेत. या व्यतिरिक्त, तामिळनाडूमध्ये कोरोनाची 1.14 लाखाहून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत, तर केरळमध्ये 1,09,799 सक्रिय प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

या 4 राज्यांव्यतिरिक्त अशी अनेक राज्ये आहेत, जी देशासाठी चिंतेचे कारण बनली आहेत. आंध्र प्रदेशात कोरोनाची अजूनही 71 हजाराहून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत. या 5 राज्यांतील कोरोना रूग्णांच्या संख्येकडे पाहिलं तर त्यांची संख्या 5.80 लाख इतकी आहे, जी एकूण सक्रिय रूग्णांच्या 70% आहे.

- Advertisement -

देशात नवीन रुग्ण सापडण्याचा वेग मंदावत आहे. मात्र, बुधवारी नवीन रुग्णांत थोडी वाढ झालेली पहायला मिळाली. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात 2 कोटी 97 लाख 313 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत 2 कोटी 84 लाख 91 हजार 670 लोक बरे झाले आहेत. भारतात या विषाणूमुळे आतापर्यंत 3 लाख 81 हजार 903 लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशात आतापर्यंत 26 कोटी 55 लाख 19 हजार 251 लसीचे डोस देण्यात आले आहेत.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.