खुशखबर: भारतात Cryptocurrency खरेदी करण्यावर बंधन नाही ? वाचा नेमके काय म्हटले RBI ने

0

- Advertisement -

मुंबई: गेल्या काही दिवसांपुर्वीच एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि एसबीआय या देशातील मोठ्य़ा बॅंकांनी आभासी चलनाद्वारे (Virtual Currency/Crptocurrency) आर्थिक व्यवहार करण्या-या ग्राहकांना त्यांची खाते बंद करण्याचा आणि सेवा न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अशा आभासी चलनांमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

 

परंतु या बाबतीत आता रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सोमवारी एक सुचना जारी केली आहे. त्यात ऱिझर्व्ह बॅंकेने 2018 च्या सुचना सर्वोच्च न्यायालयाने 2020 साली झालेल्या सुनावणीमध्ये अवैध ठरविल्या असल्याने आता आभासी चलनाच्या आर्थिक व्यवहारासाठी 2018 च्या सुचना लागू होत नाहीत. तसेच देशातील अनेक मोठ्या बॅंका 2018 च्या सुचनांचा उल्लेख करीत ग्राहकांना अशा आभासी चलनात गुंतवणूक वा आर्थिक व्यवहार करण्यास बंदी घालत आहेत. ते चुकीचे असून भारतात बिटक्वाईन (Bitcoin) व त्यासारख्या इतर आभासी चलनाची (Cryptocurrency) खरेदी करण्यास बंदी नाही असे म्हटले आहे.

 

6 एप्रिल 2018 रोजी RBI ने काढलेल्या सुचनांना 2020 च्या सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केल्याने आता त्या सुचनांची वैधता संपली असल्याचे RBI ने स्पष्टीकरण दिल्याने आता भारतात आभासी चलनांच्या (Cryptocurrency) खरेदी विक्री चा मार्ग मोकळा झाला आहे.

त्याचबरोबर RBI ने बॅंका आणि इतर वित्तीय संस्थांना कडक सुचना  दिल्या आहेत की, अशा आभासी चलनांमध्ये होणा-या गुंतवणूकी दरम्यान KYC चे नियम, सावकारी कायदे (Money Laumdering Act) तसेच इतरही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

 

- Advertisement -

भारतात अशा क्रिप्टोकरन्सींमध्ये गुंतवणूक करणा-यांची संख्या जवळपास 1 कोटीपेंक्षा अधिक झाली आहे. एका अंदाजानुसार भारतातील अनेक गुंतवणूकदारांनी  क्रिप्टोकरन्सीमध्ये 1.36 अब्ज डॅालर्सची म्हणजेच 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

क्रिप्टोकरन्सीबाबतीत RBI  ने नव्याने दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे तसेच भारतातील कायद्याचे कडक पालन करून गुंतवणूक करण्यास मुभा दिल्यामुळे क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक करणे सुरक्षित झाले आहे. परंतु RBI ने बॅंकांनी त्यांच्या ग्राहकांना अशी गुंतवणूक सुविधा उपलब्ध करून द्यायची का नाही ह्याचा निर्णय घेण्यास त्या स्वतंत्र आहेत असेही स्पष्ट केले आहे.

दरम्यान RBI गेल्या काही महिन्यापासून भारताचेही एक आभासी चलन (Cryptocurrency) असावे यासाठी तयारी करीत असून त्याच्या तांत्रिक आणि अन्य गोष्टींवर सध्या काम सुरु आहे. लवकरच भारताचेही असे एक आभासी चलन गुंतवणूकदारांना उपलब्ध होणार आहे.

RBI ने जारी केलेली सुचना इथे वाचा – RBI Circular

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.