करदात्यांनो तुम्हाला दिलासा !

0

- Advertisement -

नवी दिल्लीः कोरोनाच्या संकट काळात आयकर विभागाने टीडीएस जमा करणे आणि टॅक्स रिटर्न भरण्यासाठी करदात्यांना दिलासा देत मुदत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

अनेक करदात्यांकडून सध्याच्या काळात उद्भवलेल्या आरोग्य आणिबाणीच्या परिस्थितीचा विचार करून टॅक्स रिटर्न आणि टीडीएस जमा करण्यासाठी काही वेळेची सवलत मिळावी, असे निवेदन  केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला दिले होते. त्यानुसारच हा निर्णय घेण्यात आल्याचे मंडळाने म्हटलेय.

 

केंद्र सरकारने आर्थिक मूल्यांकन वर्ष 2020-21 ची अंतिम मुदत 31 मार्च 2021 रोजी संपलेली असताना आता ती 31 मे 2021 पर्यंत वाढविली आहे. अर्थ मंत्रालयाद्वारे जारी केलेल्या एका आदेशानुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली प्रतिकूल परिस्थिती आणि देशभरातील करदात्यांकडून, कर सल्लागार आणि इतर भागधारकांकडून मिळालेल्या विनंत्या लक्षात घेता आयकर कायदा 1961 च्या कलम 139 च्या सेक्शन 4 आणि 5 अंतर्गत रिटर्न आणि सुधारित परतावा भरण्याची तारीख दोन महिन्यांसाठी वाढवून 31 मे 2021 करण्यात आली आहे. यापूर्वी ही अंतिम तारीख 31 मार्च 2021 रोजी समाप्त झाली होती, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

सर्वच तारखा 31 मे पर्यंतच्या केल्या

- Advertisement -

आयकर कायदा 1961 च्या प्रकरण 20 नुसार कमिश्नर अपीलकडे अर्ज भरण्याची अंतिम तारीख 1 एप्रिल 2021 पर्यंत होती, जी 31 मे पर्यंत वाढविण्यात आली.

तसेच कलम 144 सी अन्वये तंटा निवारण पॅनेलसाठी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 1 एप्रिलपर्यंत होती, ती 31 मेपर्यंत वाढविण्यात आली. आणि कलम 148 अन्वये नोटिसा मिळाल्यास रिटर्न भरण्याची अंतिम मुदतही 31 मेपर्यंत वाढविण्यात आली.

 

Image – Press Release of Min. of Finance

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.