सावधान: ‘गुगल पे’ वापरकर्त्यांची साठवून ठेवते ‘ही’ माहीती, दिल्ली उच्च न्यायालयाने बजावलीये नोटीस

0

- Advertisement -

नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी Google Pay द्वारे वापरकर्त्यांच्या आधार क्रमांक आणि बँकिंग माहितीमध्ये अनधिकृत प्रवेश, त्याचा वापर आणि साठवणुकीचा आरोप करणाऱ्या एका याचिकेची सुनावणी करताना उत्तर देण्याची नोटीस बजावली आहे.

सरन्यायाधीश डी.एन. पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (UIDAI) आणि RBI लाही नोटीस बजावली आहे. तसेच येत्या 8 नोव्हेंबरपर्यंत गुगल इंडिया डिजिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे.

अर्थतज्ञ अभिजित मिश्रा यांनी, Google Pay च्या “अटी आणि शर्ती” मध्ये ही कंपनी बँक खाती आणि आधार तपशीलांसह वापरकर्त्यांचे पेमेंट निर्देशांचे तपशील संग्रहित करेल” असा उल्लेख आहे. तसेच अशी माहिती घेण्याची परवानगी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेली नाही. तसेच एक खाजगी कंपनी असल्याने, Google Pay ला नागरिकांची आधार क्रमांकासह माहिती आणि बँकिंग माहिती गोळा, वापर आणि साठवण्याचा अधिकार नाही, असा आरोप करीत दिल्ली उच्च न्यायालयात गुगुल पे विरोधात याचिका दाखल केली आहे.

या पद्धतीच्या अन्य एका जनहित याचिकेतही याचिकाकर्त्याने दावा केला आहे की, Google चे मोबाईल पेमेंट अॅप, Google Pay (GPay), RBI कडून आवश्यक अधिकृततेशिवाय आर्थिक व्यवहार करत असून, पेमेंट आणि सेटलमेंट कायद्याचे उल्लंघन करून Gpay पेमेंट सिस्टम प्रदाता म्हणून काम करत आहे. परंतु अशी कार्ये करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून कोणतेही वैध प्राधिकरण नाही, असा युक्तिवाद त्यात केला आहे.

- Advertisement -

आधीच्या याचिकेला उत्तर देताना, गुगल इंडिया डिजिटल सर्व्हिसेसने गेल्या वर्षी न्यायालयाला सांगितले होते की GPay ला RBI च्या अधिकृततेची आवश्यकता नाही कारण ती पेमेंट सिस्टम ऑपरेटर नसून तृतीय-पक्ष अनुप्रयोग प्रदाता (Third party service provider) आहे.

GPay हा तृतीय-पक्ष अॅप प्रदाता आहे आणि कोणतीही पेमेंट सिस्टम चालवत नाही, म्हणूनच त्याचे कामकाज 2007 च्या पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम कायद्याचे उल्लंघन करत नाही, असे स्पष्टीकरण आरबीआयने या आधी न्यायालयात दिलेले आहे.

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा, किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.