महत्वाची बातमी: कोरोनाच्या उपचारात वापरू नका ‘ही’ औषधे, मार्गदर्शक सुचनांमध्ये केंद्राचा बदल

0

- Advertisement -

नवी दिल्लीः देशभरात सुरु असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विविध रुग्णालयांतून होत असलेल्या कोरोनावरील उपचारांच्या मार्गदर्शक तत्वात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बदल करीत नव्या सुचना जारी केल्या आहेत. या नव्या सुचनांनुसार ज्या रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे नाहीत वा सौम्य लक्षणे आहेत त्यांना काही औषधे घेण्याची गरज नसल्याचे नमूद केले आहे.

हायड्रोक्लोरोक्वीन (hydroxychloroquine) आयव्हरमेक्टीन (ivermectin) डॅाक्सिसायक्लीन (doxycycline) आणि झिंकसर काही मल्टीव्हिटामीन्स कोरोनाच्या उपचारात वापरू नका असा वैद्यकीय तज्ञांना सल्ला देण्यात आला आहे. तसेच लक्षणे दिसत नसलेल्या रुग्णांना विनाकारण सीटी स्कॅन चाचणी करण्याचे लिहून न देण्याविषयीही सल्ला दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने आयव्हरमेक्टीन या औषधाचा वापर न करण्याचा याआधीच सल्ला दिला आहे.

तसेच गेल्या 27 मे रोजी दिलेल्या सल्ला सुचनांमध्ये दहा दिवसांपेक्षा जास्त वेळ उपचार घेणा-या मध्यम ते गंभीर कोरोनाबाधित रुग्णांसाठीच फक्त रेमेडेसीव्हीर इंजेक्शनचा वापर करावा असे म्हटले आहे.

- Advertisement -

त्याच बरोबर टॅासिलीझूमॅब (Tocilizumab) ह्या औषधाचा देखील गंभीर ते अति गंभीर रुग्णांसाठीच वापर करावा अशा सुचना केली आहे.

सविस्तर सुचना या लिंकवर वाचा Comprehensive Guidelines for Management of COVID-19

 

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.