कर्मचा-याला विशिष्ठ ठिकाणी बदलीचा आग्रह करता येणार नाही – सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा महत्वाचा आदेश

0

- Advertisement -

नवी दिल्ली: एखादा कर्मचारी एखाद्या विशिष्ट ठिकाणी बदलीसाठी आग्रह करू शकत नाही तसेच आवश्यकतेनुसार कर्मचा-यांच्या बदल्या करणे हे नियोक्ता संस्थेचे काम आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या 2017 साली दिलेल्या एका आदेशाला आव्हान देणाऱ्या एका व्याख्याताची याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.

उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यात एका सरकारी महाविद्यालयात व्याख्याता म्हणून कार्य करीत असलेल्या महिलेने सप्टेबंर 2017 साली गौतमबुद्ध नगर येथील महाविद्यालयात बदली करण्यासाठी शिक्षण प्राधिकरणाकडे विनंती केली होती. ती प्राधिकरणाने नाकारली होती. तिच्या विनंतीला प्राधिकरणाने नाकारल्यानंतर संबंधित व्याख्याता महिलेने त्या विऱोधात अलाहाबाद न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु अलाहाबाद उच्च न्यायालयानेही तिची याचिका फेटाळून लावली होती. त्याविरोधात तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सर्वोच्य न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. आर. शाह यांच्या आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशात, “कर्मचाऱ्याने त्याची/तिची बदली करण्याचा आग्रह धरणे योग्य नाही आणि/किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी त्याची/तिची बदली करू नये याचाही आग्रह करू नये. नियोक्त्याने गरज लक्षात घेऊन कर्मचाऱ्याची बदली करणे आवश्यक आहे,” असे म्हटले आहे.

- Advertisement -

याचिकाकर्ती व्याख्यातीच्या वकिलांनी 2017 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयासमोर युक्तिवाद केला होता की, ती अमरोहा येथे चार वर्षे काम करत होती आणि सरकारी धोरणानुसार ती बदलीसाठी पात्र होती.

अलाहबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद केले होते की संबंधित प्राधिकरणाने दिलेल्या निर्णयावरून असे दिसून आले आहे की व्याख्याती महिला डिसेंबर 2000 ते ऑगस्ट 2013 मध्ये तिच्या प्रारंभिक नियुक्तीच्या तारखेपासून सुमारे 13 वर्षे गौतम बुद्ध नगर येथील महाविद्यालयात नियुक्त होती आणि म्हणूनच, तिची विनंती तिला पुन्हा त्याच महाविद्यालयात बदली करणे न्याय्य नव्हते.

तसेच उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, याचिकाकर्त्याला अशा ठिकाणी काम करण्याचा अधिकार नाही जिथे तिने आधीच सुमारे 13 वर्षे काम केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा, किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.