कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना मिळणार 10 लाख रुपये

0

- Advertisement -

लखनऊ: हिंदी पत्रकारिता दिनानिमित्त उत्तरप्रदेश सरकारने मोठी घोषणा केली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना योगी सरकार 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देणार आहेत.

कोरोना काळात काम करताना बर्‍याच पत्रकारांना कोरोनाचा संसर्ग झाला असून  बर्‍याच जणांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची देखभाल करणे अवघड आहे. हे लक्षात घेता सरकारने मृत पत्रकारांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

तत्पूर्वी, उत्तरप्रदेश सरकारने कोरोनामुळे निराधार झालेल्या मुलांसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. अशा मुलांची काळजी घेणार्‍यांना सरकार दरमहा चार हजार रुपये देणार आहे.

शाळा किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेणारे किंवा व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या मुलांना लॅपटॉप व टॅब्लेट देण्यात येणार असून मुलींच्या विवाहासाठी एक लाख एक हजार रुपयांची रक्कमही देण्यात येणार आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.