तज्ञांचा इशारा: जलद लसीकरण देखील भारताला तिसर्‍या लाटेपासून वाचवू शकणार नाही, जाणून घ्या कारण

0

- Advertisement -

नवी दिल्ली: भारतात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेविषयी एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. मागील काही दिवसात लसीकरणाचे प्रमाण वाढल्यानंतरही देश साथीच्या तिसर्‍या लाटे पासून वाचू शकणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या महिन्यात आयआयटी दिल्लीनेही तिसर्‍या लाटेदरम्यान राजधानी दिल्लीत अत्यंत वाईट परिस्थितीचा इशारा दिला होता. यापूर्वी एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही 6-8 आठवड्यांत तिसर्‍या लाटेच्या आगमणाबाबत सांगितले होते.

ब्लुमबर्गच्या एका अहवालानुसार, एप्रिल मध्ये लसीची निर्यात रोखूनही आणि जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश असूनही आतापर्यंत देशातील फक्त 4% लोकांनाच लस मिळाली आहे. काही वैज्ञानिकांच्या मते येत्या काही महिन्यात कोरोंनाची तिसरी लाट येईल, तोपर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झालेले नसेल त्यामुळे पुन्हा कोरोनाचा फटका देशाला बसू शकतो.

बुधवारी स्टँडर्ड चार्टर्ड पीएलसीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात, दक्षिण आशियातील अर्थशास्त्रज्ञ अनुभूती सहाय आणि सौरव आनंद यांनी म्हटले आहे की, जर दररोज सरासरी 32 लाख डोस दर कायम ठेवला तर वर्षाच्या अखेरीस भारतातील 45% लोकांचे लसीकरण होईल. मार्च 2022 पर्यंत ही आकडेवारी 60 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. त्याशिवाय स्पुतनिक-V सह आणखी 6 लसी भारतात लसीकरण मोहिमेत वापरण्यात येणार आहेत.

देशात कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी किमान 85 ते 90 टक्के लोकसंख्येचे लसीकरण होणे गरजेचे असल्याचे,  सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. गगनदीप कांग यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

 

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.