वाहनचालकांनो आता ‘हे’ प्रमाणपत्र असल्याशिवाय नाही मिळणार गाडीचे ‘लायसन्स’

0

- Advertisement -

प्रत्येक व्यक्तीला आणि विशेष मध्ये ४५ वर्षांवरील व्यक्तींना गाडीचे लायसन्स काढण्यासाठी MBBS डॉक्टर चे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. प्रमाणपत्र असल्याशिवाय लायसन्स काढता येणार नाही. वाहन परवाना काढण्यासाठी आता एमबीबीएस डॉक्‍टरांना आरटीओ कार्यालयाकडून यूडीआय नंबर देण्यात येईल व त्या डॉक्टरला दिवसांतून केवळ 20 वाहनधारकांना प्रमाणपत्र देता येईल.

RTO कार्यालये आता पूर्णपणे ऑनलाईन होणार

आता सर्वच सरकारी कार्यालयमध्ये ऑनलाईन कामे चालतात. परंतु काहीश्या प्रमाणात RTO कार्यालय यासाठी अपवाद होता. परंतु आता ते देखील पूर्णपणे ऑनलाईन सेवा देणार आहे. यापूर्वी सर्व सेवा ऑफलाईन पद्धतीने चालत असल्यामुळे लोकांना खूप मनस्ताप सहन करावा लागत होता. पण आता त्यांची ही चिंता दूर होणार आहे. ऑनलाईन प्रणालीमुळे कामे देखील जलद गतीने होणार आहेत. वाहनधारकांकडून वसूल केल जाणारी दंडाची रक्कम आणि वाहन नोंदणीची रक्कम देखील ऑनलाईन भरता येणार आहे.

वाहनधारकांना सेवेत असलेला मोबाइल नंबर द्यावा लागणार

- Advertisement -

आपण नवीन गाडी खरेदी करतो त्यावेळी आपला मोबाइल नंबर फॉर्मवर टाकतो परंतु काही काळानंतर आपण तो नंबर बदलतो. परिणामी आपण एखाद्या वेळेस सिग्नल तोडतो तेव्हा ट्रॅफिक पोलीस हे गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो काढून घेतात आणि दंड लावतात. हा दंडाच्या रक्कम चा मॅसेज तुमच्या मोबाईलवर येतो. परंतु तुम्ही जर तो नंबर वापरत नसाल तर तुमची दंडाची रक्कम ही नकळत वाढत जाते. अशा घटना घडू नये म्हणून वाहनचालकाने त्याचा नवीन नंबर अपडेट करणे आवश्यक आहे.

असा करता येईल मोबाइल नंबर अपडेट

वाहन खरेदी करताना दिलेला नंबर जर तुम्ही वापरत नसाल, तुमचा नंबर बदलला असेल तर RTO कार्यालयातून तुम्हाला एक फॉर्म भरून तुमचा नंबर अपडेट करता येऊ शकेल. अगदी थोड्याश्या कालावधीत तुमचा मोबाईल नंबर अपडेट होईल.

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा. किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.