भारतात कोरोनाच्या चार नवीन लसी लवकरच उपलब्ध होणार, ‘या’ आहेत त्या चार लसी

0

- Advertisement -

नवी दिल्ली: कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव प्रभावी उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे काही ठिकाणी लसीकरण बंद असून, तर काही ठिकाणी अगदी संथ गतीने सुरू आहे. यावर बोलताना केंद्र सरकारने सांगितले की, देशात सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यान अजून 4 लसी उपलब्ध होऊ शकतात.

या आहेत 4 लसी…

केंद्र सरकारच्या शीर्ष सूत्रांनुसार, या लसी आहेत – जायडस कॅडिला, बायोलॉजिकल ई, नोव्हाव्हॅक्स आणि जेनोवा. एवढेच नाही तर भारतात बनलेली स्वदेशी लस कोवॅक्सिनचाही पुरवठा झपाट्याने वाढत असून, 15 ऑगस्टपर्यंत या लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी मिळेल अपेक्षा आहे.

केंद्र सरकारच्या मते, सप्टेंबर महिन्यात देशात कोरोना लसीचे एकूण उत्पादन 20 कोटी आणि ऑक्टोबरमध्ये 25 कोटी होऊ शकते. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले होते की देशातील दुसरी लाट संपली नाही. आरोग्य मंत्रालयाने 8 राज्यांच्या आर मूल्याबद्दल (R Value) चिंता व्यक्त केली होती.

R-Value म्हणजे काय?

- Advertisement -

एका कोरोना संसर्गित व्यक्तीमुळे संसर्गित झालेल्या इतर लोकांच्या संख्येला आर वॅल्यू म्हणतात. जर एखाद्या संसर्गित व्यक्तीने दुसर्‍या एका व्यक्तीमध्ये संसर्ग पसरवला तर आर मूल्य 1 असेल, परंतु जर तीच व्यक्ती 2 लोकांना संसर्गित करत असेल तर हे मूल्य 2 असेल.

या राज्यांची परिस्थिती आहे चिंताजनक

आरोग्य मंत्रालयाच्या मते, केरळ, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये आर वॅल्यू जास्त आहे. विशेषतः केरळमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. गेल्या एका आठवड्यापासून राज्यात दररोज सुमारे 20 हजार नवीन कोरोनाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. एवढेच नाही, देशातील सर्वात जास्त पॉजिटिवीटी दर असणार्‍या 44 जिल्ह्यांपैकी सर्वात जास्त 10 जिल्हे एकट्या केरळ राज्यातील आहेत.

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.