सार्वजनिक उपक्रमांच्या जमिनीं होतील विक्री अथवा देण्यात येतील भाड्याने, NLMC ची होईल स्थापना

0

- Advertisement -

नवी दिल्ली: केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या (Central Public Sector Enterprises) मधील जमिनी आणि Non-core मालमत्ता यांच्या जलदगतीने रोखीकरणासाठी (Monetisation) केंद्र सरकारद्वारे लवकरच सार्वजनिक उपक्रम विभागांतर्गत राष्ट्रीय जमीन रोखीकरण कॉर्पोरेशन (National Land Monetisation Corporation (NLMC)  ची स्थापना केली जाऊ शकते.

CNBC-Awaaz या वृत्तवाहिनीनेने दिलेल्या माहितीनुसार, जमीन मुद्रीकरण कार्पोरेशनची NLMC (National Land Monetization Corporation) स्थापना लवकरच होऊ शकते. यामुळे BEML,SCI, MTNL सह डझनभर सार्वजनिक कंपन्यांच्या (PSU) जमिनी विकण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल. यासाठी एक कॅबिनेट नोट तयार करण्यात आली असून या प्रस्तावाला लवकरच कॅबिनेटची मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

NLMC ही १०० टक्के सरकारी मालकीचे असेल, ज्यांचे प्रारंभिक अधिकृत भांडवल ५,००० कोटी आणि खरेदी केलेले भागभांडवल १५० कोटी कोटी असेल. ह्या कार्पोरेशनमध्ये संबंधित खात्याच्या सचिवांचा समावेस असेल. तसेच रिअल इस्टेट क्षेत्रातील आणि गुंतवणूक बँकांचे प्रतिनिधीही त्यात असतील. त्या बोर्डाचा एक मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) असेल जो दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन करेल.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021-22 च्या अर्थसंकल्पीय भाषणात यासाठीचा विशेष प्रस्ताव मांडला होता.

- Advertisement -

आतापर्यंत, Central Public Sector Enterprises ने मुद्रीकरणासाठी सुमारे 3,500 एकर जमीन आणि इतर बिगर महत्वाच्या मालमत्तांची निश्चिती केली आहे.  या मालमत्ता भाड्याने देणे किंवा विकणे हे काम National Land Monetisation Corporation चे असेल. मिळालेल्या माहितीनुसार NLMC व्यावसायिक किंवा निवासी हेतूसाठी मालमत्तांमध्ये गुंतवणूक करून त्या विकसित करू शकते किंवा भाड्याने वा विक्रीच्या मार्गाने पैसे गोळा करू शकते.

याव्यतिरिक्त, National Land Monetisation Corporation अतिरिक्त जमीन आणि बिगर-मालमत्ता असलेल्या सरकारी संस्थांना विकून पैसे उभारण्याच्या प्रक्रियेसाठी सल्ला सेवा देखील पुरवेल.

तुम्ही आम्हाला Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188) वरही फॅालो करु शकता.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.