लसीकरण: पंतप्रधानांच्या घोषणेनंतर सरकार हालचालीत, दिली तब्बल 74 कोटी लसींची ऑर्डर

0

- Advertisement -

नवी दिल्ली: देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली तरीही रोज सापडणारी रुग्ण संख्या अजूनही एक लाखाच्या वरच आहे. कोरोनाला रोखायचे असेल तर लसीकरणाशिवाय प्रभावी उपाय नसल्याचे तज्ञांचे मत आहे. देशात लसीकरण मोहीम सुरू असली तरीही अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद पडून असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करत केंद्र सरकारचा समाचार घेतला होता.

सर्वोच्च न्यायालयाकडून झालेल्या कानउघडणी नंतर पंतप्रधान मोदी यांनी लसीकरण वेगाने होणार असून सर्व प्रौढ व्यक्तींना मोफत लस देणार असल्याची 07 जून रोजी  घोषणा केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिवस (21 जून) पासून राज्यांना मोफत लासी पुरवणार असल्याची घोषणा केल्याच्या दुसर्‍या दिवशीच केंद्र सरकार लसींचा पुरवठा वाढविण्यासाठी हालचाल करण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य मंत्रालयाने आज मंगळवारी (8 जून) 74 कोटी लसींसाठीची ऑर्डर जारी केली आहे.

- Advertisement -

केंद्राने जारी केलेल्या 74 कोटी लसींच्या ऑर्डर मध्ये 25 कोटी कोविशील्ड, 19 कोटी कोवॅक्सिन लसी आहेत. यासोबतच बायोलॉजिकल इ लिमिटेड कडून सप्टेंबर मध्ये उपलब्ध होणार असलेल्या कॉर्बॅव्हॅक्स लसीचे 30 कोटी डोस विकत घेण्याचा आदेश जारी केला आहे. सरकारने कंपन्यांना 30% रक्कम अडवांस दिली आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.