जाणून घ्या; प्रथम डोस घेतल्यानंतरही कोरोना झाला तर दूसरा डोस कधी घ्यायचा?

0

- Advertisement -

जगभरातील अनेक ठिकाणी कोरोंना संसर्ग रोखण्यावर संशोधन सुरू असल्याने सतत नवीन माहिती समोर येत आहे. अलीकडेच कोविड-19 लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही अनेक नागरिकांना पुन्हा कोरोनाची बाधा होत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत.

या प्रकारास ‘ब्रेक-थ्रू- केस’ म्हणून तज्ञांनी संबोधले आहे. भारतात लसीचा पहिला डोस घेऊनही कोरोना बाधित होणार्‍यांची संख्या 0.05 टक्के असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) संस्थेने म्हटले आहे.

मग कधी घ्यायचा दूसरा डोस ?

आरोग्य मंत्रालयाच्या मते, जर एखाद्या नागरिकास लसीच्या पहिल्या डोसनंतर संसर्ग झाला तर याचा अर्थ असा नाही की तो दुसरा डोस घेऊ शकत नाही. फक्त दुसरा डोस हा संसर्गातून बरे झाल्यानंतर कमीतकमी चार ते आठ आठवडयानंतर घ्यावा हे सांगितले आहे.

- Advertisement -

दूसरा डोस किमान चार ते आठ आठवड्यानंतर घेण्याचा नियम ‘या’ लोकांना लागू होतो:

  1. कोविड-19 संसर्गाची सक्रिय लक्षणे असलेले लोक.
  2. असे रुग्ण ज्यांच्यात anti bodies उपलब्ध असतील किंवा ज्यांना प्लाझ्मा दिलेला असेल.
  3. इतर आजाराने अतिआजारी व्यक्ती.

कोविड 19 चे कोणतेही लक्षण नसलेले रुग्ण घरातील विलगीकरणाच्या कालावधीनंतर त्यांचा दुसरा डोस पूर्ण करू शकतात. रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राने (CDC) स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.