महत्वाची बातमी: कोरोना तिस-या लाटेत लहान मुलांच्या उपचारासाठी आरोग्य मंत्रालयाच्या ‘या’ नव्या सुचना

0

- Advertisement -

नवी दिल्ली: देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अशा लाटेत 18 वर्षे वयापेक्षा लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता गृहीत धरून आरोग्य मंत्रालयाने काल (9 जून) रात्री उशिरा आपल्या कोरोना प्रतिबंधक उपाय मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल करीत काही महत्वाच्या गोष्टींचा समावेश केला आहे.

‘Comprehensive Guidelines for Management of COVID-19 in Children’ नावाने जारी केलेल्या या सुचानांमध्ये कोरोना उपचारांमध्ये वापरण्यात येणा-या रेमडेसीव्हीर या औषधाला लहान मुलांच्या कोरोना उपचारासाठी न वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

स्टेरॉईड्सचा वापर फक्त मध्यम आणि गंभीर स्वरुपाच्या बाधित लहान मुलांसाठी करावा असे सांगण्यात आले आहे.  स्टेरॉई़ड्सचा अतिवापर हे देशात म्युकरमॉयकॉसिस सारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरला असल्याचे पुन्हा एकदा या मार्गदर्शक तत्वांमध्ये अधोरेखित करण्यात आले आहे.

तसेच वय वर्षे 5  आणि त्याखालील मुलांमध्ये मास्क वापरु नये. तर वय वर्षे 6 ते 11 पर्यंतच्या मुलांमध्ये मास्क चा वापर पालकांच्या निरिक्षणांखाली करण्यात यावा.

लहान मुलांमध्ये कोरोना संबंधित उपचार करणा-या डॉक्टरांनी high-resolution CT scans  चाचण्या लहान मुलांसाठी टाळाव्यात. तसेच जरुरी असेल अशाच लहान मुलांसाठी अशा चाचण्यांची शिफारस करावी.

काळ्या बुरशीचे काही लक्षणे दिसल्यास वैद्यकीय चाचणीच्या निकालांची वाट न पाहता त्वरीत उपचार सुरु करावेत अशा सुचना करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

तसेच 6 मिनिटे चालण्याची चाचणी फक्त 12 वर्षे वयाच्या पुढील मुलांकरीताच लागू करण्यात आली आहे. त्यात लहान मुलांच्या बोटाला ऑक्सिमीटर लावून त्यांना 6 मिनिटे चालण्यास सांगण्यात आले असून त्यात जर ऑक्सिजन सॅच्युरेशन पातळी 94 टक्केपेक्षा कमी आल्यास किंवा एकूणात 3 ते 5 टक्क्यांपेक्षा पातळी घसरल्यास तर त्यास पॉझिटिव्ह समजण्यात यावे. तसेच अशा मुलांना त्वरीत रुग्णालयात दाखल करून ऑक्सिजन दिला जावा तसेच त्यांना वैद्यकीय तज्ञांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात यावे.

तसेच अस्थमा असणा-या लहान मुलांमध्ये अशा 6 मिनिटे चालण्याच्या चाचणी न करण्याच्या स्पष्ट सुचना देण्यात आल्या आहेत.

कोरोना संसर्गाचा परिस्थिती गंभीर झाल्यास त्वरीत ऑक्सिजन थेरपी कऱण्यात यावी त्यात शरीरातील द्रव्य पातळी तसेच इलेक्ट्रोलाईट बॅलन्स सुव्यस्थित करावा आणि त्या रुग्णांना Corticosteroids therapy सुरु करण्यात यावी असे सुचविण्यात आले आहे. त्यात पुढे स्टेरॉईड्स हे लक्षणे नसणा-या व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घातक ठरु शकतात त्यामुले त्याचा वापर फक्त गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांमध्येच कऱण्यात यावा तेही रुग्णालयातील वैद्यकीय तज्ञांच्या निरिक्षणाखालीच योग्य वेळी, योग्य मात्रेत आणि योग्य काळासाठीच, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सविस्तर मार्गदर्शक  सुचना पुढील लिंकवर वाचा 511193750-202106090337278932402DteGHSComprehensiveGuidelinesforManagementofCOVID-19inCHILDREN-9June2021

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.