खासगी रुग्णालयातील लसीकरणासाठी ‘हे’ असतील नवे दर

0

- Advertisement -

नवी दिल्ली: केंद्र सरकारने 21 जूनपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लसीकरणाची घोषणा केल्यानंतर आता सरकारने खासगी रुग्णालयांमध्ये देण्यात येणाऱ्या लसींचा दर निश्चित केला आहे. म्हणजेच खासगी रुग्णालये यापुढे सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैसे आकारू शकणार नाहीत.  आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आपल्या भाषणातून यापूढे लसीची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची असेल, असे स्पष्ट केले होते.

अधिकृत कोरोना लसीसाठी प्रत्येक डोससाठी किती किंमत असणार, त्यावर सेवाशुल्क किती आकारले जाणार याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीच्या प्रत्येक डोससाठी ५ टक्के जीएसटी आणि कमाल १५० रुपये सेवाशुल्क आकारण्यात येणार आहे. त्यातही कोविशील्डसाठी जीएसटी शुल्क ३० रुपये, कोव्हॅक्सीनसाठी ६० रुपये आणि स्पुटनिक व्ही साठी ४७ रुपये निश्चित करण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी (8 जून) उशिरा एक आदेशान्वये खासगी रुग्णालये कोव्हिशिल्ड (Covishield Vaccine Price) लसीसाठी 780 रुपये, कोव्हॅक्सिन (Covaxin) लसीसाठी 1,410 रुपये आणि स्पुटनिक व्ही (Sputnik V) लसीसाठी जास्तीत जास्त 1,145 रुपये आकारू शकतात , असे स्षष्ट केले आहे.

त्याचबरोबर खासगी रुग्णालये सेवा शुल्कासाठी दीडशे रुपयांपेक्षा जास्त रक्कम आकारणार नाहीत यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी केंद्र सरकारने राज्यांवर सोपवली आहे.

- Advertisement -

एकूण लशींपैकी ७५ टक्के लशी भारत सरकार विकत घेऊन त्या नागरिकांना मोफत देणार आहे. यापुढे लसीकरणासाठी राज्य सरकारांना पैसे खर्च करण्याची वेळ येणार नाही तसेच देशातील एकूण लसीकरणातील २५ टक्के लसीकरण खासगी हॉस्पिटलमार्फत केले जाणार असल्याचेही पंतप्रधान मोदींनी सांगितले होते.

दरम्यान, कोरोना प्रतिबंधक लस कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या 44 कोटी डोसची ऑर्डर देण्यात असून लस निर्मात्या कंपन्यांकडून या लसी ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यांच्या दरम्यान उपलब्ध होतील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

राष्ट्रीय कोव्हिड लसीकरण कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्हिशिल्ड लसीचे 25 कोटी डोस आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीचे 19 कोटी डोसची मागणी नोंदविण्यात आली आहे. तसेच, या दोन्ही कोव्हिड लसींच्या खरेदीसाठी दोन्ही  कंपन्यांना 30 टक्के आगाऊ रक्कम देखील देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.