कसे ओळखाल, तुम्ही घेत असलेली लस बनावट नाही? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीये माहिती

0

- Advertisement -

नवी दिल्ली: कोरोनाविरुद्ध लढताना लसीकरण हा ऐकमेव पर्याय लोकांसमोर आहे. परंतु अनेक ठिकाणी बनावट लस दिल्या जात असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेही आंतरराष्ट्रीय बाजारातही बनावट लसींचा प्रसार होत असल्याचे उघडकीस आणले आहे. दक्षिणपूर्वी आशिया आणि आफ्रिकेत बनावट लसींच्या कुप्या सापडल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने अनेक देशांच्या आरोग्य यंत्रणांना यापुर्वीच गंभीर इशार दिला होता. त्यानंतर आता भारत सरकारच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयानेही या गोष्टीची दखल घेत भारतात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान नागरिकांना बनावट लसी ओळखता याव्यात यासाठी काही सुचना केल्या आहेत.

सावधान: भारतात कोविशिल्ड लसीचे सापडले बनावट डोस, WHO चा गंभीर इशारा

आरोग्य विभागाने राज्यांना अशी अनेक मानके (standards) सांगितली आहेत, ज्याच्या आधारावर नागरिकांना दिलेली लस खरी आहे की, बनावट आहे हे माहिती करुन घेता येऊ शकते.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना या संदर्भात पत्राद्वारे सुचित केले आहे. या पत्रात COVAXIN, Covishield आणि Sputnik V लसी संबंधित माहिती देण्यात आली आहे. जेणेकरून या लस बनावट आहेत की, नाही हे निश्चित करता येईल. कारण सध्या या तीन लसींसह देशात लसीकरण मोहीम राबवली जात आहे.

फरक ओळखण्यासाठी, तिन्ही लसींचे लेबल, रंग, ब्रँड नेम बद्दल माहिती खाली शेअर केली गेली आहे.

कोविशिल्डची लस कशी ओळखाल?

- Advertisement -

लसीच्या बाटलीवर खालील तपशील असावेत. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडीयाचे (SII) उत्पादन लेबल, ट्रेडमार्क असलेले ब्रँड नेम (Covishield) तिथे असावे. लेबलच्या चिकट बाजूला SII लोगो असेल, जेनेरिक नावाचा फॉन्ट अन-बोल्ड असेल, Recombinant समान फॉन्टमध्ये सामान्य नावाच्या खाली नमूद केले जाईल. CGS विक्रीसाठी नाही, लेबल कलर शेड गडद हिरवा आहे आणि अॅल्युमिनियम फ्लिप-ऑफ सील गडद हिरवा आहे.

 कोव्हॅसीन (COVAXIN)

लसीच्या बाटलीच्या लेबलवर Ultra Violet हेलिक्स आहे, जे केवळ UV लाइट खालीच पाहिले जाऊ शकते. लेबल क्लेम डॉट्सच्या मधे लहान अक्षरांमध्ये लपलेला टेक्स्ट आहे, ज्यामध्ये COVAXIN लिहिले असते. कोव्हॅसीनमध्ये ‘X’चा दोन रंगांमध्ये असणे, याला ग्रीन फॉइल इफेक्ट म्हणतात.

स्पुतनिक-व्ही (Sputnik V)

स्पुतनिक-व्ही लस रशियातील दोन वेगवेगळ्या प्लांटमधून आयात केली गेली असल्याने, त्या दोघांची लेबल देखील थोडे वेगळे आहेत. परंतु त्यावरील सर्व तपशील आणि डिझाइन एक सारखेच आहेत, केवळ त्यावरील निर्मात्याचे नाव वेगळे आहे. आतापर्यंत आयात केलेल्या सर्व लसींपैकी केवळ 5 एमएल पॅकेट्सवर इंग्रजीमध्ये लेबल लिहिलेले आहे. याशिवाय, उर्वरित पॅकेटमध्ये हे रशियन भाषेत लिहिलेले आहे.

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा, किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.