घरगुती गॅस सिलेंडर महागला, सामान्यांचे बजेट कोलमडले

0

- Advertisement -

महागाई मध्ये होणारी वाढ थांबता थांबत नाहीये. अगोदरच पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यातच पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. विना सबसिडीवाल्या एलपीजी सिलिंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

जाणून घ्या कोणत्या राज्यात किती असणार दर

दिल्लीतील एलपीजी सिलेंडर चा दर 859.5 इतका झाला आहे. कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरचा दर 886 रुपये, मुंबईमध्ये 859.5 रुपये, लखनऊ मध्ये 897.5 रुपये एवढे दर झाले आहेत. याचबरोबर व्यावसायिक सिलेंडरचे दर 68 रुपयांनी वाढले आहेत.

- Advertisement -

असे वाढत आहेत गॅसचे दर

तेल कंपन्यां दर महिन्याच्या पहिल्या आणि पंधराव्या तारखेला एलपीजी गॅसच्या दरांचा आढावा घेतात. 1 जुलैला तेल कंपन्यांनी गॅसचे दर 25 रुपयांनी वाढविले होते. यानंतर 1 ऑगस्टलाही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 73.5 रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र, घरगुती गॅसच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. पण आता घरगुती गॅस सिलेंडर च्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे.
अगोदरच पेट्रोल, डिझेल यांच्या किंमती वाढत असल्यामुळे सरकारवर सर्वत्र टीका होत आहे. त्यातच घरगुती गॅस चे दर वाढल्यामुळे सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा, किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.