कोरोना विरोधात लढाई जोमात सुरू; लसीकरणाचा 50 कोटींचा टप्पा पार

0

- Advertisement -

नवी दिल्ली: कोरोनाला रोखण्यासाठी देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू आहे. भारतात लसीकरणाची संख्या 50 कोटी पार केली आहे. शुक्रवारी आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करत ही माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहीले की, ‘भारताने कोरोनाविरूद्धच्या लढाईत ऐतिहासिक कामगिरी केली आहे, देशाने लसीकरणात 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. सर्वांचे अभिनंदन आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार.’ भारतात कोरोनाविरूद्ध लसीकरण मोहिम या वर्षी 16 जानेवारीपासून सुरू झाली आहे.

केंद्र सरकारने यावर्षाच्या अखेरपर्यंत देशातील सर्व प्रौढ व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. डिसेंबर 2021 पर्यंत 18 वर्षाच्या वर वयोगटातील संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण होईल की नाही? या प्रश्नाला उत्तर देताना मांडवीया म्हणाले की, भारत सरकारने कोविड -19 लसीच्या उत्पादन आणि उपलब्धतेनुसार पात्र लाभार्थ्यांसाठी कोविड -19 लसी सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्व व्यवस्था केली असल्याचेही ते म्हणाले.

या राज्यांत झाले 1 कोटीपेक्षा जास्त लसीकरण

- Advertisement -

मनसुख मांडविया पुढे म्हणाले, ‘जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 दरम्यान 18 वर्ष आणि त्यावरील वयाच्या पात्र लाभार्थ्यांना लसीकरण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात कोविड लस उपलब्ध होतील, अशी आशा आहे.’ आकडेवारीनुसार, देशातील पाच राज्य मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या 18 ते 44 वयोगटातील एक कोटीहून अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले.

कोरोना लसीकरणाची गती वाढत आहे परंतु केरळमध्ये कोविड -19 च्या नवीन रुग्णांची संख्या भयावह आहे. राज्यातील कोरोनाचे आकडे खाली आणण्यासाठी केंद्र आणि राज्ये एकत्र काम करत आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 40 हजारापेक्षा जास्त नवीन प्रकरणे सापडली आहेत.

ताज्या बातम्यांसाठी Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.