‘व्हॅक्सिन मैत्री’ अंतर्गत पुन्हा लसींची सुरु होणार निर्यात

0

- Advertisement -

नवी दिल्ली: आम्हाला पुढील महिन्यात कोविड लसीचे 30 कोटींहून अधिक डोस मिळण्याची अपेक्षा आहे. Biological E आणि इतर कंपन्या त्यांच्या लस बाजारात आणत असल्याने उत्पादन वाढेल त्यामुळे भारत आता पुन्हा लसीची निर्यात सुरु करेल असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले आहे.

देशातील लसीकरण मोहिम वेगवान पद्धतीने सुरु आहे. आरोग्य मंत्रालयाने 11 दिवसात 10 लाख लसीचे डोस दिले आणि चार दिवसात आम्ही दररोज एक कोटीहून अधिक लसीचे डोस दिले आहेत. त्यामुळे लस मैत्री अंतर्गत, भारत आता जगाला मदत करू इच्छितो आणि चौथ्या तिमाहीत जागतिक आरोग्य संघटनेतर्फे जागतिक स्तरावर सुरु असलेल्या लस उपलब्ध करून देण्याच्या COVAX या प्रोजेक्टमध्ये योगदान देऊ लसीकरण मोहिमेला गती देण्यास हातभार लावू असे ते म्हणाले.

आजही लसीकरणाचा आकडा एक कोटीच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले.

जगभरातील देशांना कोविड -19 लस देण्यासाठी भारत सरकारने हाती घेतलेला लस मैत्री हा मानवतावादी उपक्रम आहे. भारत सरकारने 20 जानेवारी 2021 पासून लस देणे सुरू केले. 9 मे 2021 पर्यंत भारताने 95 देशांना लसींचे 66.3 दशलक्ष डोस वितरित केले. यापैकी 10.7 दशलक्ष डोस भारत सरकारने 47 देशांना भेट म्हणून दिले होते. उर्वरित 54 दशलक्ष सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने त्याच्या व्यावसायिक आणि कोव्हॅक्स दायित्वांतर्गत पुरवले गेले होते.

- Advertisement -

त्यानंतर मार्च 2021 च्या उत्तरार्धात, भारत सरकारने देशात आलेल्या दुस-या कोविड लाटेनंतर कोविड लसींची देशांतर्गत गरज असल्याचे कारण देत लसींची निर्यात तात्पुरती बंद केली होती.

दरम्यान देशभरात पात्र नागरिकांना गेल्या 24 तासात  37 लाख 78 हजार 296 लसीचे डोस दिले असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. आत्तापर्यंत देशात एकूण 80 कोटी नागरिकांचे (80 कोटी 85 लाख 68 हजार 144) लसीकरण करून एक महत्वाचा टप्पा पार केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.