बेहिशोबी गुंतवणूकीचे Pandora Papers: भारतातल्याही बड्या धनाढ्यांची नावे

0

- Advertisement -

मुंबई: जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या पनामा पेपर्स लीक प्रकरणानंतर पॅन्डोरा पेपर प्रकरण (Pandora Papers Leak) उघडकीस आले आहे. जगातील विविध देशातील अनेक धनाढ्यांनी विदेशात संशयास्पद आर्थिक गुंतवणूक केल्याची बाब उघड झाली आहे. जगातील इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव जर्नालिस्ट्स या गटातील  117 देशांच्या 600 पत्रकारांनी केलेल्या पँडोरा पेपर्स (Pandora Papers) या शोध मोहिमेत भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसह (Sachin Tendulkar) प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्यासह 300 भारतीय दिग्गजांची नावं असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या कागदपत्रांतून आशिया आणि मध्य पूर्वेतील काही देश तसेच अमेरिका आणि लॅटिन अमेरिकेतील शेकडो आजी माजी राजकिय नेत्यांचाही उल्लेख आहे.

सचिन बरोबरच पत्नी अंजली तेंडूलकर, सासरे आनंद मेहता यांच्या नावाचा समावेश आहे. भारतातील किमान 60 प्रमुख व्यक्ती आणि कंपन्यांच्या परकीय मालमत्ता धारण केल्याप्रकरणी चौकशी करण्यात आली. येत्या काळात आणखी नावे उघड होण्याची शक्यता आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ या आघाडीच्या इंग्रजी वर्तमानपत्राने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे.

पँडोरा पेपर्सच्या माहितीनुसार, भारतातील केवळ राजकारणी आणि सेलिब्रिटींनीच नाही तर महसूल विभागाचे माजी अधिकारी, आयकर खात्याचे माजी आयुक्त आणि माजी सैन्याधिकाऱ्यांचाही समावेश आहे. पेंडोरा पेपर्समधील 11.9 मिलियन अर्थात 1.19 कोटी फाईल मधील कागदपत्रात पनामा, दुबई, मोनाको, स्वित्झर्लंड आणि केमॅन बेटांसारख्या ठिकाणी दिग्गज समजल्या जाणाऱ्या ट्रस्ट आणि कंपन्यांचे दस्ताऐवज आहेत. त्यात जगातील 35 राजकीय नेत्यांची नावे आहेत, यात सत्ताधारी आणि माजी सत्ताधारी नेत्यांचाही समावेश आहे. याशिवाय उद्योगपती आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचा देखील समावेश आहे.

- Advertisement -

सचिन तेंडूलकर आणि त्याच्या कुटूंबातील दोन व्यक्तिंव्यतिरिक्त रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी तसेच फरार हिरे व्यापारी नीरव मोदी  याचेही नाव त्यात असल्याचे इंडियन एक्सप्रेस ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

मात्र तेंडुलकरच्या वकिलांकडून तेंडुलकर यांची सर्व गुंतवणूक वैध मार्गाने केलेली असून तसे आयकर विभागालाही माहिती देण्यात आली होती, असा दावा करण्यात आला आहे.

तुम्ही आम्हाला Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188) वरही फॅालो करु शकता.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.