मोठी बातमी: रामदेव बाबा विरोधात Indian Medical Association ने केली पोलिसांत फिर्याद

0

- Advertisement -

नवी दिल्ली: योगगुरु रामदेव (राम कृष्ण यादव) आणि भारतीय वैद्यकीय संघटना यांच्या सुरु असलेला वाद आता आणखी तीव्र झाला असून भारतीय वैद्यकीय संघटनेने बाबा रामदेव यांनी बदनामीकारक विधाने केल्याच्या विरोधात आता दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

भारतीय वैद्यकीय संघटनेचे महासचिव डॅा. जयेश लेले यांच्याकडून ही फिर्याद आयपी ईस्टेट पोलिस स्टेशनमध्ये दाकल करण्यात आली आहे.

“गैरमार्गाने फायदा मिळवून देण्याच्या दृष्टीने बेकायदेशीर आणि अप्रामाणिक हेतूने रामदेव यांचे वर्तन आहे आणि यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील काम करणा-या सर्व लोकांचे तसेच सामान्य लोकांचे मोठे नुकसान झाले”.असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे रामदेव यांनी 1897 च्या साथ रोग महामारी कायद्याच्या कलम 3 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि भारतीय दंड संहींते अंतर्गत रामदेव यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करावा आणि दंडात्मक कारवाई करावी असे तक्ररीत म्हटले आहे.

बाबा रामदेव यांचा एक व्हिडीओ सामाजिक माध्यमांमध्ये सध्या प्रसारीत झाला असून त्यात ते आपल्याला कोणाचा बापही अटक करु शकत नाही असे बोलताना दिसत आहेत. त्यानंतर आज भारतीय वैद्यकीय संघटनेने ही फिर्याद दाखल केली आहे.

- Advertisement -

पहा काय म्हटले होते रामदेव –

 

दरम्यान भारतीय वैद्यकीय संघटनेच्या उत्तराखंड राज्य शाखेच्या अध्यक्षांनी ही बाबा रामदेव यांना त्यांच्या वकीलामार्फत 15 दिवसांत लिखित स्वरुपात तसेच एका व्हिडीओद्वारे माफी जाहीर करा अन्यता 1 हजार कोटी रुपयांची अब्रुनुकसान भरपाई द्या अशा आशयाची नोटीस धाडलेली आहे.

त्या आधी रामदेव यांना केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनीही आपले व्यक्तव्य मागे घेण्यास सांगितले होते. तसे रामदेव यांनी लिखित पत्रात आपण व्यक्तव्य मागे घेत असल्याचे जाहीर केले परंतु त्यानंतर त्यांनी ट्विटर द्वारे एका खुल्या पत्रात भारतीय वैद्यकीय संघटनेला 25 प्रश्नांची उतरे मागितली होती.

भारतीय वैद्यकीय संघटनेच्या देशातील विविध राज्य शाखांनीही अशा पद्धतीच्या कारवाईची मागणी केली आहे. तसेच भारतीय आर्युविज्ञान संस्थेली डॅाक्टरांनी बाबा रामदेव यांच्या विरोधात निदर्शने केली आहेत.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.