व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा वाढ, घरगुती वापरायच्या गॅसच्या किंमती स्थिर

0

- Advertisement -

दिल्ली: इंधनच्या दरवाढीत सातत्याने प्रचंड प्रमाणात होणार वाढ अजूनही थांबताना दिसत नाही. पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol and diesel) दर वाढलेले असतानाच आता 19 किलो व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत तेल कंपन्यांनी वाढ केली आहे आज (1 ऑगस्ट) पासून 19 किलो व्यावसायिक एलपीजी गॅस (LPG gas)  सिलिंडरच्या किंमतीत 73.5  रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 73.5 रुपयांनी वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे विविध शहरात आता व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती किमान 1500 रुपयांच्या पुढेच गेल्या आहेत.

राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1,500 रुपयांवरून 1623 रुपये प्रति सिलेंडर तर कोलकत्यात 1629 रुपये, मुंबईत 1579 रुपये तर चेन्नईमध्ये 1761 रुपये प्रति सिलिंडर अशी झाली आहे.

दर महिन्याला या तेल कंपन्यांच्यामार्फत नवीन दर जारी केले जातात. जुलै महिन्यात तेल कंपन्यांनी 14.2 किलो विनाअनुदानित घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25.50 रुपयांची वाढ केली होती. ऑगस्ट सुरु होत असताना किंमती  मात्र अजून वाढविल्या नाहीत. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती मात्र किमान 830 रुपयांच्या आसपास अजून स्थिर आहेत.

- Advertisement -

एलपीजी सिलेंडरची किंमत तपासण्यासाठी गॅस पुरवठादार कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन ग्राहकांना या किंमती आपल्या शहरानुसार पहाता येऊ शकतात.

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

किंवा Telegram चॅनल: https://t.me/Deccanviews मध्ये सहभागी व्हा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.