पत्नीचे शरीर ही भौतिक संपत्ती नाही, इच्छेविरूद्ध शारिरीक संबंध हा वैवाहीक बलात्कार – केरळ उच्च न्यायालयाचा निकाल

0

- Advertisement -

कोचि – पत्नीच्या शरीराला पतीद्वारे खाजगी संपत्ती समजणे आणि तिच्या इच्छेविरूद्ध शारीरीक संबंध करणे हा वैवाहीक बलात्कारच आहे अशा कडक शब्दांत केरळ उच्च न्यायालयाने एका खटल्यातील आरोपीला सुनावले आहे.

कुटूंब न्यायालयात घटस्फोटाला मिळालेल्या मंजूरीच्या स्थगितीसाठी एका व्यक्तिने केरळ उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या होत्या. केरळ उच्च न्यायालयातील न्यायमुर्ती ए. मोहम्मद आणि न्यायमुर्ती कौसर एडप्पागथ यांच्या खंडपीठाने त्या याचिका फेटाळून लावत वरील कडक शब्दांत याचिकाकर्त्याला फटाकावले आहे.

लग्न आणि घटस्फोट हे धर्मनिरपेक्ष कायद्यांतर्गत व्हायला हवेत आणि आता वेळ आली आहे की देशात विवाहाच्या कायद्यांना पुन्हा एकदा नव्याने बनविण्याची गरज आहे, असे या न्यायमुर्तींनी दिलेल्या निकालात म्हटले आहे.

तसेच भारतीय दंड संहीतेच्या कलमान्वये वैवाहीक बलात्कार मान्य होत नाही, केवळ ह्या ऐकमेव कारणामुळे न्यायालयांना घटस्फोटांच्या निकालाचा आधार बनविण्यापासून रोखता येणार नाही. पत्नीची स्वायत्ततेची अवहेलना करणा-या पतीचा अवैध स्वभाव हा वैवाहिक बलात्कार आहे. तरी या स्वभावाला दंड देता येत नसला तरी ही बाब शारीरीक आणि मानसिक क्रूरता दर्शविते.  त्यामुळे आमचा विचार आहे की वैवाहिक बलात्कार हा घटस्फोटाचा दावा करण्याचा ठोस आधार आहे, असे दोन न्यायमुर्तींच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

या खंडपीठाने क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटाच्या दोन्ही याचिका स्विकारायला कुटूंब न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात जात पतीने केलेल्या अपिलाला फेटाळून लावले आहे. या व्यतिरिक्त पती द्वारे वैवाहिक अधिकारांची मागणी करणारी आणखी एक याचिकाही न्यायालयाने फेटाळली आहे.

- Advertisement -

या प्रकरणातील दांम्पत्याचे लग्न 1995 साली झाले होते, त्यानंतर त्यांना दोन मुलेही झाली आहेत.

न्यायालयाने निकाल देताना असेही म्हटले आहे की, व्यवसायाने डॉक्टर असलेल्या पतीने  लग्नाच्या वेळी आपल्या होणा-या पत्नीच्या वडीलांकडून सोन्याची 501 नाणी, एक कार आणि एक फ्लॅट घेतला होता. कुटूंब न्यायालयाने समोर ही गोष्ट आली असून पती आपल्या पत्नीला एक पैसे कमावण्याची मशीन असल्यासारखा व्यवहार करत होता. आणि पत्नीने  हे शोषण फक्त आपल्या विवाहाच्या कारणाने सहन केले. परंतु पतीद्वारे होणारे शोषण आणि क्रूरता जेव्हा सहनशीलते पलिकडे गेली तेव्हा तिने घटस्फोट याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला.

घटस्फोट मिळावा म्हणून या पत्नीने आपल्या पोटगी सारख्या सर्व आर्थिक दाव्यांचाही त्याग केला, घटस्फोटासाठी ती गेली 12 वर्षे पतीच्या क्रूर स्वभावाविरूद्ध न्यायालयाचे दरावाजे ठोठावते आहे असे स्पष्ट करीत न्यायालयाने म्हटले आहे की, पती जेव्हा आपल्या पत्नीच्या शरीरालाही आपली संपत्ती समजू लागतो तेव्हा तो निश्चितच वैवाहिक बलात्कार ठरतो आणि आधूनिक सामाजिक न्यायशास्रात या बाबीस कोणतेही स्थान नाही.

ताज्या बातम्यांसाठी  Facebook ( https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188  ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.