केंद्रीय मंत्री अजय मिश्रांना बडतर्फ करण्याची मागणी, तर मृतांच्या कुटुबियांना प्रत्येकी 45 लाखाची मदतीची उत्तर प्रदेश सरकारची घोषणा

0

- Advertisement -

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करीत असलेल्या शेतक-यांच्या संयुक्त किसान मोर्चाने सोमवारी (4 आक्टोबर) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या संदर्भात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दौऱ्यावर शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान रविवारी लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तिकोनिया भागात झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. संयुक्त किसान मोर्चाने राष्ट्रपतींना लिहीलेल्या पत्रात, “केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना त्यांच्या पदावरून त्वरीत काढून टाकण्यात यावे आणि त्यांच्यावर हिंसा भडकवण्यासाठी आणि जातीय द्वेष पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल करावा. केंद्रीय मंत्र्याचा मुलगा आशिष मिश्रा “मोनू” आणि त्याच्या साथीदारांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (खून) अन्वये गुन्हा दाखल करावा आणि त्यांना ताबडतोब अटक करावी” अशी मागणी केली आहे.

दरम्यान, लखीमपूर खीरी येथे घटनेनंतर शेतकरी आणि प्रशसनात चर्चा झाली,  या चर्चेनंतर हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 45-45 लाख रुपये देण्यात येतील. तसेच, या हिंसाचाराची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशामार्फत चौकशी केली जाईल असे जाहीर करण्यात आले आहे. तर हिंसाचारात जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 10-10 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येईल. सरकारने ठोस अश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी रविवारपासून सुरु असलेले आपले आंदोलन मागे घेतले. लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता.

लखीमपूर खीरी येथील हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षाचे प्रमुख नेते लखीमपूर येथे दाखल होत होते. मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना रोखले किंवा ताब्यात घेऊन अटक केली. विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार लखीमपूर येथे, जेव्हा शेतकऱ्यांच्या एका गटाने केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना त्यांच्या कथित व्यक्तव्याबद्दल निषेधाचा जाब विचारण्यासाठी त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला तेव्हा हिंसाचार भडकला. आंदोलनकारी शेतकरी हे केंद्रीय मंत्री मिश्रा यांच्या भाषणामुळे नाराज होते. शेतकऱ्यांचा दावा आहे की, मंत्र्यांच्या ताफ्यातील एका वाहनाने आंदोलनकारी शेतकऱ्यांना चिरडले. त्यानंतर हिंसाचार उफाळला.

कशावरून सुरु झाला हिंसाचार, काय आहे प्रकरण

- Advertisement -

मिश्रा गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या संसदीय मतदारसंघात गेले होते जेथे कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. यामुळे गृह राज्यमंत्री संतप्त झाले आणि काळे झेंडे दाखवणाऱ्यांना हा गंभीर इशारा दिला. तेव्हापासून शेतकरी त्याच्या विरोधात आंदोलन करत होते आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या बनबीरपूर येथील त्यांच्या मूळ गावात आयोजित कार्यक्रमात निघून जाण्याचा निषेध करत होते.

त्यानंतर शेतकऱ्यांना इशारा देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात मिश्रा “सामना करो आकर” असे म्हणताना दिसत आहेत. ‘तुम्हाला दुरुस्त करायला, फक्त दोन मिनिटे लागतील.” असे या व्हिडीओमध्ये ते म्हणत आहेत, “मी फक्त मंत्री नाही, मी फक्त खासदार नाही, मी फक्त आमदार नाही, ज्यांना आमदार आणि खासदार होण्यापूर्वी माझ्याबद्दल माहिती आहे ते मला हे देखील माहित आहे की मी कोणत्याही आव्हानापासून पळून जात नाही.” मिश्रा चेतावणी स्वरात म्हणाले, “ज्या दिवशी मी ते आव्हान स्वीकारले आणि ते केले, लक्षात ठेवा की मला लखीमपूर पर्यंत जावे लागेल, पालिया नाही.” तज्ञांच्या मते, मिश्रा गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या संसदीय मतदारसंघात गेले होते जेथे कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. यामुळे गृह राज्यमंत्री संतप्त झाले आणि काळे झेंडे दाखवणाऱ्यांना हा गंभीर इशारा दिला. तेव्हापासून शेतकरी त्याच्या विरोधात आंदोलन करत होते आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या बनबीरपूर येथील त्यांच्या मूळ गावात आयोजित कार्यक्रमात निघून जाण्याचा निषेध करत होते.

तुम्ही आम्हाला Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188) वरही फॅालो करु शकता.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.