कोरोना: जाणून घ्या रुग्णांना कुठे आणि कसे मिळेल DRDO ने बनवलेले औषध

0

- Advertisement -

कोरोना विषाणूच्या रोगाविरुद्धच्या लढाईत भारताला एक महत्वपूर्ण हत्यार मिळाले असून, त्याचे नाव 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी) आहे. हे कोरोना रोगावरील औषध असून, याची निर्मिती भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने ( DRDO) केली आहे. पावडरच्या स्वरुपात असलेले हे औषध बनवण्यासाठी एक वर्षाचा वेळ लागला असून त्याच्या वापराला केंद्र सरकारने आधीच मान्यता दिली आहे. आता आज केद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय आरोग्य मंत्री डॅा. हर्षवर्धन यांनी हे औषध आज बाजारात विक्री उपलब्ध झाले असल्याची घोषणा केली. या औषधाचा वापर सर्वप्रथम DRDO च्या कोविड रुग्णालयात भरती रुग्णांसाठी करण्यात येणार आहे.

ह्या औषधाने (2-डीजी) रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना लवकर बरे होण्यास मदत होते तसेच कृत्रिम ऑक्सिजनवर अवलंबून राहण्याची शक्यता हे औषध कमी करते असा दावा डीआरडीओ आणि केंद्र सरकारद्वारे दिलेल्या माहितीत करण्यात आला आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे तसेच ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे औषध रुग्णांचे ऑक्सिजनवरील अवलंबवित्व कमी करणार असल्याचे मानले जात आहे.

रुग्णांना औषध कसे दिले जाईल?

- Advertisement -

पावडर स्वरुपातील हे औषध पाकिटात असणार आहे, यास पाण्यात मिसळून रुग्णांना देण्यात येणार आहे.  हे औषध कोरोना बधित पेशींवर थेट काम करणार आहे. ज्याने शरीरातील रोगप्रतीकारक शक्ति वाढेल आणि रुग्ण लवकर ठीक होईल. रुग्णाचे वजन आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कमीत कमी 5 – 7 दिवस सकाळ आणि संध्याकाळ असे 2  डोस दिले जातील अशी माहीती डीआरडीओ संस्थेचे प्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी दिली आहे.

कुठे आणि किती लोकांवर करण्यात आली चाचणी?

मागच्या वर्षी एप्रिलमध्ये या औषधाच्या पहिल्या टप्प्याची चाचणी करण्यात आली होती, ज्यात हे औषध कोरोना संसर्गवाढीला रोखू शकत असल्याचे आढळून आले होते. या आधारावर दुसर्‍या टप्प्यात 110 रुग्णांवर 6 रुग्णालयात चाचणी केली गेली. सकारात्मक परिणाम समोर आल्यानंतर देशभरातील 27 रुग्णालयांतील 220 रुग्णांवर हे औषध वापरले गेले. ज्यात दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल , महाराष्ट्र इत्यादि ठिकाणचे रुग्ण होते.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.