घरगुती गॅस महागला, पेट्रोलच्या दरात एका आठवड्यात सव्वा रुपयाने वाढले

0

- Advertisement -

मुंबई: नवरात्र, दसरा आणि पुढे येणा-या दिवाळीच्या तोंडावर घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली असल्याने सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी घरगुती एलपीजी ( LPG) सिलिंडरच्या किंमतीत तब्बल 15 रुपयांची वाढ केली आहे. अनुदानित 14.2 किलो सिलिंडरच्या दरात 15 रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर आता एका सिलिंडरसाठी ग्राहकांना 900 रुपये मोजावे लागणार आहेत. याआधी विनाअनुदानीत गॅस सिलिंडर 43 रुपयांनी महागला होता.  गेल्या जानेवारी पासून 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 205.50 रुपयांची वाढ झाली आहे.

दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी एक ऑक्टोबरला गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर केले होते. त्यात घरगुती वापराच्या अनुदानीत सिलिंडरचे दर स्थिर ठेवण्यात आले. मात्र, व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 43 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. एका व्यावसायिक सिलिंडरचे दर 1881.23 होता. दरवाढीनंतर आता प्रति सिलिंडर 1924.23 रुपयांना खरेदी करावा लागत आहे. या दरवाढीचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे. त्यामुळे हॉटेलमधील जेवण महागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर उच्चांकावर पोहोचले आहेत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी देशांतर्गत किंमतीही पुन्हा वाढविल्या आहेत. पेट्रोलच्या दरात एका आठवड्यात पेट्रोलच्या किंमतीत तब्बल सहाव्यांदा वाढ झाली. पेट्रोलच्या दरात 1 रुपया 25 रुपयांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 10 दिवसांत 9 वेळा वाढ करण्यात आली आहे. डिझेल एका आठवड्यात 2 रुपये 15 पैशांनी महागलं आहे.

- Advertisement -

बुधवारी (6 आक्टोबर) देशभरात पेट्रोल दरात 26 ते 30 पैसे तर डिझेल दरात 34 ते 37 पैशांनी वाढ झाली आहे.

तुम्ही आम्हाला Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188) वरही फॅालो करु शकता.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.