एकाच वेळी दोन सख्ख्या बहीणींसोबत केले लग्न, पोलिसांनी केली अटक, जाणून घ्या पूर्ण प्रकरण

0

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी सामाजिक माध्यमांमध्ये एक फोटो खुप प्रसारीत होत होता. फोटो मध्ये एक नवरदेव दोन वधुंसोबत थांबलेला दिसत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही वधू सख्या बहिणी आहेत. एकाच मंडपात या दोघींचे लग्न एकाच वरासोबत झाले. मात्र, हे लग्न आता कायद्याच्या कचाट्यात अडकले आहे.

‘वर’ मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे वरपक्ष आणि वधू पक्षाचे कुटुंब हैराण झाले आहे. अखेर या लग्नावर का प्रश्न उपस्थित झाले ? एकत्र दोन मुलीसोबत लग्न करणे बेकायदेशीर आहे का? कायदा काय म्हणतो ? संपूर्ण प्रकरण काय आहे ? हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न करू…

कुठे आणि कधी घडली घटना?

ही घटना कर्नाटक मधील कोलार जिल्हयातील आहे. 30 वर्षीय मुलगा उमापती याची ललितासोबत लग्न करण्याची इच्छा होती. ललिताने लग्नाला होकार दिला. परंतु, तिने लग्नासाठी एक अट ठेवली. उमापतीला ललितासोबतच तिच्या मोठ्या बहिणीसोबत लग्न करण्याची तिने अट ठेवली. ललिताची मोठी बहीण सुप्रिया अपंग अससून तिला बोलता व ऐकता येत नाही. ललिताची ही अट उमापतीने मान्य केली. 7 मे रोजी एकाच मंडपात उमापतीचे ललिता आणि सुप्रिया सोबत लग्न झाले. यानंतर लग्नातील फोटो सामाजिक माध्यमांमध्ये एक फोटो खुप ठिकाणी व्हायरल झाला.

पोलिसांनी केली अटक?

- Advertisement -

व्हायरल झालेल्या फोटोंमुळे हे कुटुंब अडचणीत आले. नवरदेवाला पोलिसांनी आटक केली. छोटी बहीण ललिता अल्पवयीन असून तिचे वय फक्त 17 वर्षे आहे. असे तेथील बाल कल्याण विभागातील अधिकार्‍यांना आढळून आले. सोबतच लग्नादरम्यान कोरोना नियमाचे पालन न केल्यामुळे दोन्ही कुटुंबाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कायदा काय सांगतो?

कायद्यानुसार हे लग्न बेकायदेशीर आहे. दोन लग्न करणे गुन्हा आहे. या प्रकरणात आरोपी उमापतीने एकाच वेळी दोन्ही महिलांशी लग्न केले आहे. हिंदू विवाह कायद्यानुसार एकाच वेळी दोन महिलांशी लग्न अवैध आहे. दोषी ठरल्यास आरोपींना बाल विवाह प्रतिबंधक कायदा 1979 अन्वये 3 महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते असे ज्येष्ठ वकील के.व्ही. धनंजय यांनी म्हटले आहे.

एवढेच नाहीतर भारतीय दंड संहितेनुसार जर त्या व्यक्तीने अल्पवयीन वधू सोबत लैंगिक संबंध ठेवले असल्याचे आढळल्यास बलात्कार गृहीत धरला जाऊ शकता, त्या व्यक्तीस जन्मठेपेचीही शिक्षा होऊ शकते.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.