जामिनासाठी 60 लाख रुपये नसल्याने भोगावा लागला 6 वर्षे तुरूंगवास, सुप्रीम कोर्टाने काढून टाकली अट

0

- Advertisement -

नवी दिल्ली: ओडिसा मध्ये फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या व्यक्तीला जामीन मिळाला होता, पण तो तुरूंगातून बाहेर येऊ शकला नाही. जामिनासाठी लागणारी प्रचंड रक्कम देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्या व्यक्तीला जामीन मिळाला असला तरी सुमारे सहा वर्षे तुरूंगातच रहावे लागले. आता त्या आरोपीला दिलासा देताना 60 लाख रुपये जमा करण्याची अट सर्वोच्च न्यायालयाने काढून टाकली आहे.

न्यायमूर्ती विनीत शरण आणि न्यायमूर्ती बी.आर. गवई यांनी उच्च न्यायालयाने 16 जुलै 2015  दिलेल्या आदेशात जामीनसाठी इतर अटीसोबत घातलेली 60 लाख रुपयांची अट हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आरोपी एसके मुंताज यांनी उच्च न्यायालयाच्या अटीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

- Advertisement -

सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, विचाराधीन कैदी म्हणून याचिकाकर्त्याने सहा वर्षांहून अधिक काळ तुरूंगात घालविला आहे. या व्यक्तीस 23 जून 2014 रोजी अटक करण्यात आली होती. याचिकाकर्त्याने गरीब सून तो एका कंपनीत फक्त एक रखवालदार असल्याचा युक्तिवाद केला.

आरोपींने 21 ऑक्टोबर 2020 च्या हायकोर्टाच्या जामिनाच्या अटीतून दिलासा देण्यास नकार दिलेल्या आदेशाला आव्हान दिले होते. यावर सुप्रीम कोर्टाने आरोपीला 60 लाख रुपये जमा करण्याची अट काढून त्याला जामिनावर सोडण्याचा आदेश दिला. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने सन 2015 मध्ये उच्च न्यायालयाने लागू केलेल्या अटी कायम ठेवल्या आहेत. आरोपीला या सर्व अटी पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. फक्त पैस्याची अट हटवण्यात आली आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.