माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना कोरोनाबाधा

एम्स इस्पितळात दाखल

0

- Advertisement -

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची कोविड -19 ची चाचणी पॅाझिटीव्ह  आली असून त्यांना सोमवारी दुपारी त्यांना भारतीय आर्युविज्ञान संस्था म्हणजे एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे

डॉ. सिंह यांना हलका ताप आल्यानंतर त्यांची कोविड चाचणी घेण्यात आली होती. त्यांनी लसींचे दोन्हीही डोस (कोवाक्सिन) घेतलेले आहेत. त्यांना खबरदारीचा विषय म्हणून रुग्णालयात हलविण्यात असून डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

शनिवारी डॉ. सिंह यांनी देशातील कोविड परिस्थितीबद्दल सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीत भाग घेतला होता.

- Advertisement -

नुकतेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे कोरोना मुळे देशात सर्वत्र उद्बवलेल्या परिस्थीतीला हाताळण्यासंबंधी पाच सुत्री सल्ला दिला होता. तसेच मोदींनी वयाच्या 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांनाही प्राथमिकतेने कोविड लस द्यावी आणि फ्रंटलाईन कामगार प्रवर्गांची व्याख्या करण्यास राज्यांना परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी पत्रात मोदींना केली होती.

दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी ट्विवरवर ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

 

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.