शेतमालाच्या आधारभूत किंमती: रब्बी हंगामासाठी हरभ-यसाठी 130 रुपये तर गव्हासाठी फक्त 40 रुपये प्रति क्विंटल वाढ

0

- Advertisement -

नवी दिल्ली: केंद्रीय आर्थिक व्यवहारविषयक  मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) रब्बी विपणन हंगाम (आरएमएस) 2022-23 साठी सर्व  रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीमध्ये (एमएसपी) वाढ करायला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

शेती उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य आणि किफायतशीर भाव मिळावा यासाठी सरकारने रब्बी विपणन हंगाम  2022-23 साठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत मसूर ,रॅपसीड आणि मोहरी  (प्रत्येकी 400 रुपये प्रति क्विंटल) आणि हरभरा (130 रुपये प्रति क्विंटल) या पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत सर्वाधिक संपूर्ण  वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे .करडईच्या बाबतीत, हमीभावामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रति क्विंटल 114 रुपयांची वाढ झाली आहे.विविध प्रकारची पिके घेण्याला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने, विविध पिकांसाठी वेगवेगळी किमान आधारभूत किंमत देण्याचा उद्देश आहे.

हरभऱ्याची आधारभूत किंमतीत १३० रुपयांनी वाढ करुन ती ५,२३० रुपये प्रति क्विंटल झाली आहे. मसूरच्या आधारभूत किंमतीमध्ये ४०० रुपयांनी वाढ केल्यानंतर ती प्रति क्विंटल ५,५०० रुपयांवर गेली आहे. कुसूम फूलाची आधारभूत किंमती ११४ रुपयांनी वाढवून ५,४४१ रुपये प्रति क्विंटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जव ची एमएसपी ३५ रुपयांनी वाढवून १६३५ रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे.

तर गव्हाच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल फक्त ४० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वाढ झाल्यानंतर गहू किमान २,०१५ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जाईल.

 

विपणन हंगाम 2022-23 साठी सर्व रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (रु. क्विंटलमध्ये)

- Advertisement -

Crops MSP for RMS 2021-22

 

MSP for RMS 2022-23

 

Cost* of production 2022-23 Increase in MSP

(Absolute)

Return over cost (in per cent)
Wheat 1975 2015 1008 40 100
Barley 1600 1635 1019 35 60
Gram 5100 5230 3004 130 74
Lentil (Masur) 5100 5500 3079 400 79
Rapeseed &

Mustard

4650 5050 2523 400 100
Safflower 5327 5441 3627 114 50

(तक्ता – PIB, Govt of India)

ज्या किंमतीवर सरकार शेतकऱ्यांकडून पीक उत्पादन खरेदी करते  ती किंमत म्हणजे किमान आधारभूत किंमत (MSP) होय.  सध्या देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलन सुरु आहे. त्यातही मंजूर करण्यात आलेल्या कृषी कायद्यांसह किमान आधारभूत किंमतीचाही मुद्दा महत्वाचा ठरत आहे.

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा, किंवा जॉइन करा टेलीग्राम चॅनल: https://t.me/Deccanviews

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.