देशात म्युकरमायकोसिसचे 8 हजाराहून अधिक रुग्ण, केंद्राने दिले 23 हजार इंजेक्शन, त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला 5 हजार 90 इंजेक्शन्स

काळ्या बुरशीला आरोग्य विम्यात सामील करा, सोनिया गांधींची मोदींकडे मागणी

0

- Advertisement -

देशात काळी बुरशी वा म्युकरमायकोसिस या आजाराचे सुमारे 8 हजार 848 रुग्ण असून त्यांना उपचारात वापरण्यात येणाऱ्या महत्वाच्या Amphotericin B या औषधाचे 23 हजार 680 डोस विविध राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना वितरीत कऱण्यात आले असल्याची माहीती केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांनी ट्विटर वरून जाहीर केली आहे.

या आजाराच्या संसर्गाचे प्रमाण देशात वाढत असून त्यावरच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या Amphotericin B या औषधाचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे.

देशात गुजरात राज्यात या आजाराने कळस केला असून राज्यात 2 हजार 281 सक्रीय रुग्ण आहेत, तर महाराष्ट्रात काळ्या बुरशीचा संसर्ग झालेले 2 हजार रुग्ण आहेत. या राज्यांखालोखाल आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक व हरीयाणा राज्यात जास्त रुग्ण आहेत.

- Advertisement -

तसेच या आजारातील उपचारासाठीच्या औषधांचा पुरवठा वाढाविण्याकरीता ह्या औषधाच्या उत्पादक कंपन्यांव्यतिरीक्त इतर 5 अतिरीक्त कंपन्यांना हे औषध बनविण्यासाठी परवाना देण्यात आला अशल्याचे केद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी म्हटले आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावर विरोधकही आता आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहित या औषधाची उपलब्धता तात्काळ वाढवावी अशी मागणीही केली आहे.

या पत्रात त्यांनी ‘म्युकरमायकोसिस’ आजाराच्या औषध तुटवड्यावरून चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी या आजाराचा सामना करण्यासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध केला जावा. तसेच, त्यांनी Liposomal Amphotericin-B च्या तुटवड्यावरून कारवाईची मागणी करत, आयुष्यमान भारत व इतर आरोग्य विम्यांमध्ये म्युकरमायकोसिसला कवर करण्याची देखील विनंती केली आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.