किसान सन्मान निधीच्या 19000 कोटी रुपयांचे वाटप सुरु

0

- Advertisement -

देशातल्या एकूण 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात किसान सन्मान निधीचे 19 हजार कोटी रुपये जमा कऱण्यात आले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत दिली जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

या योजनेत प्रत्येक पात्र शेतकरी कुटूंबास दरवर्षी रु 6000 या प्रमाणे आर्थिक मदत केली जाते. चार महीन्यातून एकदा रु 2000 अशी वर्षातून तीनदा या मदतीची रक्कम शेतक-यांच्या बॅंक खात्यात थेट हस्तांतरीत केली जाते.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या वाटपानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बंगालमधल्या शेतकऱ्यांना प्रथमच या योजनेचा लाभ मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

देशातल्या करोना परिस्थितीवर यावेळी भाष्य करताना ते म्हणाले की, भारत करोना विरुद्धच्या लढाईत अजून हिंमत हरलेला नसून ही लढाई एका अज्ञात न दिसणा-या शत्रुविरूद्ध आपण लढतो आहोत. करोनाशी लढण्यासाठी सरकार शक्य ते प्रयत्न करत आहे. असल्याचेही ते म्हणाले.

देशातल्या ग्रामीण भागामध्ये करोना फोफावत असल्याने नागरिकांना लस घेण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. देशात आत्तापर्यंत १८ कोटी लोकांनी लस घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.