देशात ‘राष्ट्रीय आणिबाणीची’ स्थिती, केंद्राला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

0

- Advertisement -

 नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी देशातील कोरोनाच्या स्थितीबद्दल स्वतः दखल घेत ऑक्सिजनचा पुरवठा आणि लसीच्या मुद्दय़ासह चार मुद्द्यांबाबत केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. कोविडमुळे देशातील परिस्थिती राष्ट्रीय आणीबाणीसारखी झाली असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी म्हंटले आहे.

आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय योजना असायला हवी आहे. तसेच विविध उच्च न्यायालये या विषयावर सुनावणी घेत असून हे मुद्दे आमच्याकडे ठेवायचे की नाही हे आम्ही पाहू असे सांगतानाच, लॉकडाउन लादण्याचा अधिकार राज्यांना असावा असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

 

ऑक्सिजनचा पुरवठा, आवश्यक औषधांचा पुरवठा, ही लस लागू करण्याची पद्धत व लॉकडाऊन या विषयावर विचार केला जाईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

 

दिल्ली, मध्य प्रदेश, मुंबई, कलकत्ता, सिक्कीम आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी घेत आहेत, जरी ते चांगल्या हितासाठी सुनावणी घेत आहेत, परंतु यामुळे गोंधळाचे वातावरण तयार होते आहे.

- Advertisement -

ऑक्सिजन तयार करण्यासाठी आपला प्रकल्प सुरू करण्याची परवानगी मागणार्‍या वेदांता कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर बोलत असताना सर्वोच्च न्यायालयाने ही प्रतिक्रिया नोंदविली आहे.

तामिळनाडू राज्याला काल या याचिकेवर सुनावणी हवी होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने कोविडच्या परिस्थितीवर अनेक मुद्द्यांची दखल घेतली आणि म्हटले की देशातील परिस्थिती ही राष्ट्रीय आणीबाणीसारखी झाली आहे.

बुधवारीही दिल्ली उच्च न्यायालयात ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या व समान वाटपाच्या समस्येवर सुनावणी झाली, त्यामध्ये देशभरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा निर्माण होत आहे आणि वाढत्या मृत्यूमुळे ‘या साथीची स्थिती पाहून असे दिसते की सरकारला जीवितहानीची चिंता नाही अशा शब्दांत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले होते.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.