ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही म्हणणार्‍या मोदी सरकारच्या डोळ्यात अंजन घालणार्‍या या घटना खोट्या आहेत का?

0

- Advertisement -

मंगळवारी केंद्र सरकारने राज्यसभेत एक माहिती देत खळबळ उडवली. सरकारने म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या अभावामुळे एकही मृत्यू झाला नाही. नवनियुक्त आरोग्य मंत्री भारती प्रवीण पवार यांनी राज्यसभेत दिलेल्या या माहितीमुळे विरोधी पक्षाला सरकारवर प्रश्न उपस्थित करण्याची संधीच मिळाली. त्यांच्या या विधानामुळे सर्व सामान्य जनतेसह भाजप समर्थक सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत.

कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेत एक काळ असा होता ज्यावेळी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पूर्ण देश झगडत होता. त्यावेळी देशविदेशातून ऑक्सिजन च पुरवठा करण्यात आला. ऑक्सिजन आणि बेड न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत होत्या. उत्तरप्रदेश राज्यातील आग्रा आणि बहराईच जिल्ह्यातील 2 घटना त्यावेळी खूप वायरल झाल्या होत्या.

आग्र्याची रेणु सिंघल तिच्या नवर्‍याला वाचवण्यासाठी अनेक दवाखान्यात फिरली पण ऑक्सिजन आणि बेड न मिळाल्यामुळे तिच्या पतीचा मृत्यू झाला. रेणु जेव्हा एसएन हॉस्पिटलच्या आपत्कालीन गेटजवळ पोहोचली होती तेव्हा तिच्या पतीला घ्यायला दवाखान्यातील कोणीच आले नाही. यावेळी तिच्या पतीच्या तोंडातून जीभ बाहेर आली होती. अशा परिस्थितीत तिला काय करावे सुचत नव्हते. तेव्हा तिने स्वतःचा जीव धोक्यात घालून तिने तिच्या पतीच्या तोंडाने श्वास देण्याचा प्रयत्न केला. जेव्हा या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर वायरल झाला तेव्हा देशभरातील लोकांनी हळहळ व्यक्त केली.

- Advertisement -

अमर उजालाने यावर सविस्तर वृत्त लिहिले आहे. त्या वृत्तानुसार रेणु सिंघल यांनी सांगितले की, “मी माझा जीव देऊनही त्यांना वाचवले असते. परंतु सिस्टममुळे मला हार पत्करावी लागली. माझ्या पतीचा माझ्या मांडीवरच मृत्यू झाला. यापेक्षा जास्त दुर्दैव काय असू शकतं. त्या दिवशी जर त्यांना वेळेवर ऑक्सिजन मिळालं असतं तर ते आज जीवंत राहिले असते”

दुसरी घटना बहराईच जिल्ह्यातील आहे. ही घटना सुद्धा अतिशय धक्कादायक आहे. बहराईच येथील जिल्हा रुग्णालयात भरती झालेल्या महिलेला ऑक्सिजनची गरज होती मात्र त्यांना ते मिळाले नाही. त्यावेळी ऑक्सिजनच तुटवडा होता आणि प्रशासनाने सुद्धा हात वर केले होते. अशावेळी महिलेच्या दोन मुलींनी स्वतः आलटून-पालटून तोंडाने श्वास देत होत्या. यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता.

अशा परिस्थितीत या दोन्ही घटना केंद्रातील मोदी सरकारला प्रश्न विचारतात, आकडेवारी सुधारण्यासाठी आम्हालाही खोटे ठरवण्यात येईल का ? आमच्या भावनांना काही मूल्य नाही का?

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.