पेट्रोल डिझेलवर GST नाहीच, कोरोनाची औषधे 31 डिसेंबर पर्यंत GST मुक्त

0

- Advertisement -

लखनौ : आरोग्य मंत्रालय आणि फार्मास्युटिकल्स विभागाच्या शिफारशीनुसार सुचविण्यात आलेल्या औषधांना वैयक्तिक वापरासाठी आयातीवर आयजीएसटीमध्ये सूट देण्यात आली असून पेट्रोलियम उत्पादनांना जीएसटी च्या कक्षेत आणण्याचा सध्या कुठलाही विचार नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले आहे. लखनऊमध्ये 45 व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

अर्थमंत्र्यांनी पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या कयासांना पूर्णविराम दिला. “पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार करावा असा केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे आम्ही हा विषय़ आजच्या बैठकीत चर्चेला घेतला परंतु पेट्रोलियम उत्पादने जीएसटीच्या कक्षेत आणण्याची ही योग्य वेळ नाही. यासाठी महसुलाशी संबंधित अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागेल असा सर्वांचा विचार आहे. तसे आम्ही न्यायालयास कळवू, असे त्या म्हणाल्या.

कोरोनाच्या उपचारांशी संबंधित औषधे Amphotericin B – nil rate, Tocilizumab – nil rate, Remdesivir – 5%, anticoagulants like Heparin – 5% हे सवलतीचे दर जे 30 सप्टेंबरपर्यंत वैध होते ते आता 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आले आहेत.

परंतु जीएसटी दरातील ही सवलत केवळ उल्लेखित औषधांसाठीच आहे. यातमध्ये वैद्यकीय उपकरणांचा समावेश नसल्याचे सितारामन यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

कोरोना विषाणूच्या उपचारामध्ये ज्या जीवनरक्षक औषधांचा वापर केला जात नाही अशा झोल्जेन्स्मा( Zolgensma) आणि विल्टेप्सो (Viltepso) सारख्या महाग आयात केलेल्या औषधांवर जीएसटी सूट दिली जाईल असे त्यांनी जाहीर केले.

तर Swiggy, Zomato सारख्या खाद्य वितरण कंपन्यांवरील कराचा मुद्दाही मंत्र्यांच्या गटाकडे (GoM) विचारासाठी पाठवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी वाचण्यासाठी Facebook (https://www.facebook.com/Deccan-Views-105929734974188 ) वर फॅालो करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.